Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमीयुगुलांचा आवडीचा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ कधीपासून होतोय साजरा; जाणून घ्या ‘या’ दिवसाचा इतिहास अन् महत्त्वपूर्ण माहिती

Valentine's Day History : प्रेमियुगुलांसाठी खास विशेष असलेला दिवस म्हणजे "व्हेलेंटाईन डे" होय. तुम्हाला माहिती आहे का की 'व्हॅलेंटाईन डे' फक्त १४ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? सेंट व्हॅलेंटाईन कोण होता? 'व्हॅलेंटाइन डे'चा इतिहास काय आहे आणि तो साजरा करण्याचे मार्ग काय आहे ते जाणून घ्या.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 12, 2024 | 09:40 PM
The interesting history of Valentine's Day: how it happened and why it should be celebrated

The interesting history of Valentine's Day: how it happened and why it should be celebrated

Follow Us
Close
Follow Us:

History and Importance of Valentine’s Day : प्रेम करणाऱ्या प्रत्येक हृदयासाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. लव्ह बर्ड्स या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. याच महिन्यात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीला रोझ डेने व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात होऊन १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेने समाप्त होतो. ‘व्हॅलेंटाईन डे’वर लोक त्यांच्या पार्टनरला स्पेशल फील देण्यासाठी गिफ्ट देतात आणि त्यांच्यासोबत हँग आउट करण्याचे प्लॅन करून त्यांना सरप्राईज देतात. पण तुम्हाला माहित आहे का की व्हॅलेंटाईन डे फक्त १४ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? सेंट व्हॅलेंटाईन कोण होता? व्हॅलेंटाईन डेचा इतिहास काय आहे आणि तो साजरा करण्यामागील खरी सुंदर कथा काय आहे ते जाणून घेऊया.
कशी झाली व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची सुरुवात?

दरवर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात साजरा

‘व्हॅलेंटाईन डे’ दरवर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जातो. ज्याची सुरुवात रोमन राजा क्लॉडियसच्या काळात झाली. असे म्हणतात की त्या काळी रोममध्ये सेंट व्हॅलेंटाइन नावाचा एक धर्मगुरू होता. व्हॅलेंटाईन डेची ही कहाणी त्यांच्या प्रेमाला आणि त्यागाला समर्पित आहे. ज्यांच्या नावाने नंतर व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाऊ लागला.
काय आहे व्हॅलेंटाईन डेचा इतिहास?

प्रेम आणि विवाह पुरुषांच्या शक्तीचा नाश

खरं तर राजा क्लॉडियसचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह पुरुषांच्या शक्तीचा नाश करतात. या विचारामुळे त्यांनी आपल्या राज्यात एक आदेशही काढला की राज्यातील अधिकारी आणि सैनिक लग्न करू शकत नाहीत. पण, त्याउलट सेंट व्हॅलेंटाईन नेहमीच जगात प्रेम वाढवण्याबद्दल बोलत असे. जेव्हा सेंट व्हॅलेंटाईनला राजाचा हा आदेश कळला तेव्हा त्याने विरोध केला. त्यांनी अनेक सैन्य अधिकारी आणि सैनिकांची लग्ने करून दिली. जेव्हा राजाला हे कळले तेव्हा त्याने १४ फेब्रुवारी २६९ रोजी सेंट व्हॅलेंटाइनला फाशी दिली. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याच्या बलिदानाचा सन्मान केला आणि त्याच्या स्मरणार्थ ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला व्हॅलेंटाईन डे?
‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची सुरुवात रोमन सणापासून झाली. ४९६ साली जगात प्रथमच ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात आला. त्यानंतर पाचव्या शतकात रोमच्या पोप गेलेसियस यांनी १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. या दिवसापासून रोमसह जगभरात दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस मोठ्या थाटामाटात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.

Web Title: The interesting history of valentines day how it happened and why it should be celebrated nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2024 | 09:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.