ते बुडाले समुद्रात पण गेले नाहीत! खोल दर्यात दिसतात बुडते हात, ऐकू येतात किंचाळ्या; ‘ती’ बोट अजून आहे
S.S वेलेंसिया : उत्तर पॅसिफिकचा टायटॅनिक १९०६ मधील अपघातानंतर आजही या जहाजाभोवती भुताटकीच्या कहाण्या सांगितल्या जातात. नाविकांना बुडते प्रवासी, किंकाळ्या आणि पांढऱ्या वस्त्रांतील आकृत्या दिसल्याचे अनुभव आहेत.
S.S वेलेन्सिया हे जहाज अनेकांना ठाऊक असेल, कदाचित काहींना बिलकुल माहित नसेल. या जहाजाला ‘उत्तर पॅसिफिकचा टायटॅनिक’ असेही म्हंटले जाते. कारण जवळजवळ गोष्ट सारखीच आहे. पण या गोष्टीला मात्र भुताटकीच्या स्पर्श आहे. जहाज बुडाली, प्रवासी बुडाले, तरीही आजही त्या बुडत्या प्रवाशांचे दर्शन खोल सागरात प्रवास करणाऱ्या खलाश्यांना होत असतो. ते तुटलेले जहाज तुटक्याच अवस्थेत आजही खलाश्यांना दिसते. इतकेच नव्हे तर आणखीन अशा गोष्टी दिसतात, जे पाहताना वाटेल की हे भास आहे, पण ते सत्य असतं.
S.S वेलेन्सिया ही बोट १८८२ मध्ये बांधण्यात आली होती. बोटीचं बांधकाम तसं मजबूत होतं. पण डिजाइनमुळे ही बोट अनेकनाच्या मनाला खटकली होती. शेवटी, घडायचे ते घडूनच गेले. १९०६ साली, अमेरिकेच्या सॅन्स फ्रान्सिस्कोवरून निघाली असता बोटीला तुफानी वाऱ्यांचा सामना करावा लागला. यामध्ये बोटीची दिशा चुकली आणि 108 प्रवासी व चालक दलासह ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्यावरच्या खडकांना धडकून बोट कायमची पाण्यात विलीन झाली. सुदैवाने या दुर्घटनेत ३७ जण बचावले.
या अपघातानंतर एसएस वेलेंसियाच्या कथेला अधिक गूढ आणि भयाण स्वरूप प्राप्त झाले. जहाज ज्या ठिकाणी बुडाले, त्या परिसरातून पुढील अनेक वर्षे जाणाऱ्या जहाजांवरील नाविकांनी विचित्र अनुभवांची नोंद केली. कुणी सांगत होते की त्यांनी समुद्राच्या गाभाऱ्यात अजूनही बुडणाऱ्या जहाजांचे अवशेष पाहिले, तर कुणी बुडणाऱ्या प्रवाशांचे हात समुद्राच्या पृष्ठभागावरून वर येताना पाहिले. काहींनी तर स्पष्टपणे तुटलेल्या, काळोखात बुडालेल्या जहाजाची आकृती पाण्यावर तरंगताना पाहिल्याचे म्हटले. या सर्व दृश्यांसोबतच सर्वांत जास्त भितीदायक गोष्ट म्हणजे महिलांच्या रडण्याच्या आणि किंकाळ्यांच्या आवाजा.
अनेक नाविकांनी असा दावा केला आहे की त्यांनी समुद्राच्या अथांग लाटांमध्ये पांढऱ्या वस्त्रांमध्ये सजलेल्या स्त्रिया पाहिल्या आहेत. या स्त्रिया कधी पाण्यावर हात हलवत तर दिसतात, पण जवळ गेल्यावर धुरासारख्या नाहीशा होतात. या जागेवरून गेलेल्या मच्छीमारांनी देखील अनेकदा पाण्यावर अनोळखी चेहरे दिसल्याचे सांगितले आहे. काहींनी सांगितले की त्यांनी बुडालेल्या प्रवाशांची मदतीसाठी तडफडणारी आकृती पाहिली, जी हळूहळू समुद्रात विलीन झाली.
या ठिकाणच्या घटनांमुळे स्थानिक लोक आणि नाविकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. समुद्राचा हा भाग “भुताटकी समुद्री पट्टा” म्हणून ओळखला जातो आणि इथून प्रवास करणे अत्यंत अपशकुनी मानले जाते. प्रत्येक वर्षी अपघाताच्या बरसिवारी, म्हणजे जानेवारी महिन्यात, येथे समुद्राच्या लाटांसोबत स्त्रियांचे रडण्याचे आवाज, मुलांच्या आर्त हाकांचा आवाज आणि बुडणाऱ्यांची किंकाळी ऐकू आल्याची नोंद केली जाते.
Web Title: The ss valencia is a formidable ship of the north pacific