गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट घरी बनवा शाही बदामाचा हलवा
गणपती बाप्पाचे सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात स्वागत झाले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या जलौषात सगळीकडे तयारी करण्यात आली होती. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरी अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. पण बाप्पाच्या प्रसादासाठी नेमकं काय बनवावं, हा प्रश्न कायमच सगळ्यांना पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शाही बदामाचा हलवा बनवू शकता. बदाम हलवा चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही झटपट बदाम हलवा बनवू शकता. प्रसादामध्ये दिले जाणारे पदार्थ थोडेसे खाल्ल्यानंतर सुद्धा पोट भरते आणि मनाला आनंद मिळतो. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये बदाम हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक नाचणीचा चिला, शरीरातील हाडे राहतील मजबूत