
फोटो सौजन्य - Social Media
जगण्याची जिद्द असली की व्यक्ती, जगण्यासाठी कोणत्याही थराला जातो. अशीच एक घटना पाश्चिमात्य देशांकडे स्थित असणाऱ्या एका निर्जन बेटावर घडली. या बेटाचे नाव आहे लॉगरहेड की (Loggerhead Key)! हे बेट तसे फार काही प्रसिद्ध नव्हते, 2017 साली १८ वर्षांच्या ईथन वॉकर या कोस्ट गार्ड ट्रेनीला या बेटावर 48 तासांच्या सरावासाठी सोडण्यात आले होते. दरम्यान, त्याच्याकडे एक तंत्र होते, ज्याच्या साहाय्याने कोस्ट गार्ड सॉफटवेअरमध्ये त्याच्या स्थितीची माहिती मिळत होती. पण याच वेळी त्या बेटावर एक भयानक वादळ आले आणि त्या वादळात तंत्रामध्ये आणि सॉफ्टवेअरमध्ये Glitch आला आणि ईथन वॉकर माघारी आला असल्याची नोंद त्या सॉफ्टवेअरमध्ये झाली. त्यामुळे कोस्ट गार्ड संस्थानाने सुटकेचा श्वास सोडला कारण अधिकृतरित्या ईथन वॉकर माघारी परतला होता.
अधिकृतरीत्या जरी असला तरी खऱ्या आयुष्यात तो त्याच निर्जन बेटावर फसला होता. वादळवार्यांना झेलत, भूकमारीला सहन करत, तहानल्या पोटाने झोपत! पुढचे जवळजवळ 1000 दिवस त्याला वाचवण्यासाठी कुणी आले नाही. या 3 वर्षांच्या काळात त्याने मोठ्या संघर्षला लढा दिला. चेहऱ्यावर दाढीचा एक केस नसणारा इथनं जेव्हा इथून वाचून निघतो तेव्हा त्याची अवस्था एका जनावरासारखी असते. पावसाचे पाणी साचवत आणि समुद्रातून किनाऱ्यावर फेकले जाणारे मासे खाऊन तो दिवस घालवत होता. त्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांनी त्याच बेटावर कुणी तरी आल्याची जाणीव त्याला झाली. कदाचित ते कोस्ट गार्डचे नवीन ट्रेनी मंडळी सरावासाठी आले असावेत असा त्याचा अंदाज होता जो बरोबरही आहे. पण वाईट गोष्ट अशी की ती मंडळी सरावासाठी बेटाच्या पूर्व दिशेला आली होती आणि हा पश्चिमेकडे फसला होता. त्यामुळे त्याने एक युक्ती लावली. त्याच्याकडे असणारी लाकडं त्याने जाळली जेणेकरून जळणाऱ्या धुरामुळे कदाचित त्या मंडळींचे लक्ष वेधता येईल पण इथनच्या नशीबाने आणि वातावरणाने त्याला काही साथ दिली नाही कारण वारा हा पूर्वेकडून पश्चिमेकडे सुटला होता, त्यामुळे आगीचा धूर हा त्या मंडळींच्या दिशेने न जाता तो बेटाच्या पश्चिमेकडे समुद्रात गेला आणि त्या युक्तीचा काहीच फायदा झाला नाही. काही वेळाने ती मंडळी परतीच्या प्रवासाला निघून गेली आणि इथनच्या वाचण्याची आणखीन एक आशा नष्ट झाली.
काही महिन्यांनी त्या ठिकाणी भीषण वादळ आले या वादळात बेटावरही पाणी पसरले होते. बेटावर मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. या वादळात इथनचे फार मोठे नुकसान झाले. या वादळात त्याच सगळं काही वाहून गेलं, त्याने एका झाडाला पकडून ठेवले म्हणून तो वाचला अन्यथा तोही सामानासोबत समुद्राच्या पोटात विसावून गेला असता. वादळामुळे बेटावर पावसाचं पाणी साचवण्यासाठी स्वच्छ जागा राहिली नव्हती त्यामुळे त्याला दूषित पाणी पिऊन दिवस काढावे लागले. यामुळे त्याचे आजारी पडण्याचीही मोठी शक्यता होती. पावसात तर त्याला कच्चे मासे खावे लागत होते.
पाहता-पाहता तीन वर्षे उलटून गेली. त्यालाही जाणीव होती की वाचवायला कुणी येणार नाही जे काही आहे ते आपल्यालाच करायचे आहे. जगण्याची जिद्द त्याच्यात अफाट होती. त्याने एक युक्ती केली. सलग तीन महिने त्याने लाकडे गोळा केली आणि ते संपूर्ण बेटावर पसरवली आणि बेटालाच आग लावून टाकली आणि स्वतः मात्र समुद्रात एका नौकेच्या सहारे त्या आगीपासून लांब ठेवले. वातावरण तपासणाऱ्या रडारमध्ये एक गोष्ट कैद झाले की अचानक लॉगरहेड की (Loggerhead Key) बेटावरची उष्णता भयंकर वाढली आहे. त्यात एका विमानाने पाहिले की या बेटावर सगळीकडे फक्त नि फक्त आगच दिसून येत आहे. तेव्हा रिसर्च टीमच्या साहाय्याने ईथन वॉकरला या तीन वर्षांच्या संघर्षातून बाहेर काढण्यात आले.
मुक्त झालेल्या ईथन वॉकरनेही पुन्हा कोस्ट गार्ड जॉईन करण्याचे ठरवले आणि संस्थंनाने त्याला त्याच्या शौर्यासाठी पुरस्कारीतदेखील केले.