हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसून येतात 'हे' बदल
धावपळीची जीवनशैली, कामच वाढलेला तणाव, बिघडलेले मानसिक आरोग्य, चुकीचा आहार, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जगभरात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. हार्ट येण्याच्या एक महिना आधीपासून शरीरात अनेक बदल दिसून येतात. हल्ली हार्ट अटॅक कोणत्याही वयातील व्यक्तीला येऊ शकतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. छातीत दुखायला सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक ऍसिडिटी किंवा पित्ताची समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र सतत दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.(फोटो सौजन्य – istock)
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर किंवा आठवडाभर अधिक केवळ छातीत नाही तर शरीराच्या अनेक अवयवांमध्ये वेदना होऊ लागतात. या वेदना सामान्य समजून अनेक लोक दुर्लक्ष करतात. त्यामुळे हार्ट अटॅक आल्यानंतर मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या आठवडाभर आधी चेहऱ्यावर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
बऱ्याचदा हिरड्या लाल होणे किंवा हिरड्यांमधून रक्त येणे ही समस्या अतिशय सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र ही समस्या सामान्य नसून हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे हिरड्यांमधून रक्त येत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. यामध्ये असलेले घातक विषाणू रक्तप्रवाहात प्रवेश करुन हृदयाच्या नसांना नुकसान पोहचवतात.
अचानक दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यास दुर्लक्ष करू नये. दात हलणे किंवा दातांमध्ये वेदना होणे इत्यादी सामन्यांकडे दुर्लक्ष करून मेडिकलमधील गोळ्या औषध खाल्ली जातात. पण मेडिकलमधील गोळ्या वारंवार घेणे धोक्याचे आहे. हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात जळजळ वाढण्याची शक्यता असते. तसेच दयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊन शरीराचे गंभीर नुकसान होईल.
शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे किंवा स्ट्रेसमुळे तोंडात वारंवार छाले पडतात. यामुळे खाताना किंवा पाणी पिताना वेदना होऊ लागतात. या वेदना बऱ्याचदा असह्य झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या किंवा औषधांचे सेवन केले जाते. तसेच यामुळे शरीरात रक्तभिसरण आणि अशक्तपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. हार्ट अटॅक येण्याआधी तोंड येणे ही सामान्य समस्या नसून धोक्याचे लक्षण आहे.
‘या’ भाजीचे सेवन केल्यास मेंदूमध्ये होतील किडे, जाणून घ्या न्यूरोसिस्टीसर्कोसिसबदल सविस्तर माहिती
तोंडाच्या खालच्या भागात, मान आणि छातीमध्ये वेदना होऊ लागल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी महिलांच्या शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात.
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?
हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांपैकी एकामध्ये (हृदयविकाराच्या धमन्यांमध्ये) अडथळा निर्माण होतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हा अडथळा बहुतेकदा रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक (चरबीचे साठे) जमा झाल्यामुळे होतो, ज्यामुळे रक्ताची गुठळी होऊ शकते. जर रक्तप्रवाह गंभीरपणे कमी झाला किंवा तुटला तर हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकते.
हृदयविकाराच्या झटक्यावरील उपचार?
रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि पुढील नुकसान कमी करण्यासाठी डॉक्टर अॅस्पिरिन, रक्त गोठणे कमी करणारी औषधे (थ्रोम्बोलायटिक्स) आणि इतर रक्त पातळ करणारी औषधे वापरू शकतात.धमनी उघडी ठेवण्यासाठी बलून कॅथेटर आणि स्टेंट (एक लहान जाळीदार नळी) वापरून ब्लॉक झालेल्या धमन्या उघडण्याची प्रक्रिया.
हृदयविकाराची लक्षणे आढळल्यास काय करावे?
जर व्यक्ती शुद्धीवर असेल आणि तिला अॅस्पिरिन लिहून दिले असेल, तर ती व्यक्ती ते घेऊ शकते. तथापि, हे फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा जर त्या व्यक्तीला हृदयरोग असल्याचे निदान झाले असेल तरच करावे.