मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात सतत क्रॅम्प येतात? मग आजीबाईच्या बटव्यातील 'हे' उपाय ठरतील प्रभावी
सर्वच महिलांना महिन्यातील चार ते पाच दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळी आल्यानंतर महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेल्या वेदना, क्रॅम्प, कंबर दुखणे, अतिरक्तस्त्राव इत्यादी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कंबरदुखी, अंग दुखणे, चिडचिड इत्यादींमुळे मासिक पाळीचे दिवस आणखीनच कंटाळवाणे वाटू लागतात. मासिक पाळी आल्यानंतर पोट दुखी किंवा कंबर दुखीची समस्या उद्भवल्यास अनेक महिला मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे मासिक पाळीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मासिक पाळी आल्यानंतर घरगुती पदार्थांचे सेवन करून आराम मिळवावा.(फोटो सौजन्य – istock)
‘या’ भाजीचे सेवन केल्यास मेंदूमध्ये होतील किडे, जाणून घ्या न्यूरोसिस्टीसर्कोसिसबदल सविस्तर माहिती
डॉक्टरांच्या मते, मासिक पाळी आल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण करणे, स्नायूंना आराम देणे आवश्यक आहे. याशिवाय गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेतल्यास पोट किंवा कंबर दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. मासिक पाळी आल्यानंतर ओवा, गूळ आणि तुपाचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेले क्रॅम्प आणि वेदना कमी करण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास मासिक पाळीच्या वेदना कायमच्या दूर होतील.
मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या लाडूचे सेवन करावे. साजूक तूप, ओवा आणि गुळाचे सेवन करून तयार केलेला लाडू आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये साजूक तूप घेऊन त्यात ओवा आणि गूळ एकत्र व्यवस्थित भाजून घ्या. गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लाडूचे मिश्रण घट्ट होईल. तयार केलेले मिश्रण थोडेसे थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून लाडू तयार करा. या तीन पदार्थांपासून बनवलेले लाडू शरीरात कायम उष्णता टिकवून ठेवतात. मासिक पाळीच्या आधी किंवा मासिक पाळीच्या दिवसांमध्ये लाडू खाल्ल्यास फरक दिसून येईल.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओले Underwear घातल्यास होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या लक्षणे
पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. ओव्यांमध्ये अँटी-स्पॅस्मोडिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. पाळीच्या दिवसांमध्ये आतड्यांमध्ये सुद्धा वेदना वाढण्याची शक्यता असते. लाडूचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील आकुंचन कमी होते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे लाडू खावे. तसेच गुळामध्ये असलेले सेरोटोनिन शरीरात उष्णता निर्माण करते.
मासिक पाळीच्या वेदना म्हणजे काय?
डिसमेनोरिया म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान होणारी वेदना. ही वेदना सामान्यतः ओटीपोटात, कमरेला किंवा मांड्यांमध्ये जाणवते. या वेदना काही स्त्रियांच्या बाबतीत सौम्य असू शकतात, तर काहींना असह्य वेदना होतात. या वेदना मासिक पाळीच्या सुरुवातीला किंवा काही दिवस आधी सुरू होऊ शकतात.
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्याचे उपाय?
पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन किंवा ॲस्पिरिन सारख्या ओव्हर-द-काउंटर वेदनाशामक औषधांनी वेदना कमी होऊ शकतात. काही योगासने आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम वेदना कमी करण्यास मदत करू शकतात, जसे की चालणे, सूर्यनमस्कार, किंवा श्वासोच्छवासाचे विशेष व्यायाम.
नेहमी लक्षात ठेवा?
मासिक पाळीच्या वेदना सामान्य आहेत, परंतु त्या तीव्र झाल्यास, त्यामागे काही आरोग्य समस्या असू शकते. जर तुम्हाला खूप वेदना होत असतील, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य उपचार घ्या.