फोटो सौजन्य - Social media
ग्रीन टी आरोग्यासाठी फार उत्तम आणि प्रभावशाली मानली जाते. परंतु, या चहाची चव प्रत्येकाला आवडणारी नसते. एकंदरीत, ग्रीन टीच्या चवीमुळे अनेक लोकं ती पिण्यास नकार देतात किंवा टाळतात. ग्रीन टी चवीमुळे टाळत असाल तर तुम्ही ग्रीन टी च्या विविध फायद्यांपासून स्वतःला विल्पुत ठेवत आहात. आरोग्याच्या या फायद्यांपासून स्वतःला वंचित ठेवण्यापेक्षा ग्रीन टीचे नियमित सेवन करणे कधीही उत्तम असते.
हे देखील वाचा : करीना कपूरच्या सुंदर त्वचेचे रहस्य आले समोर, 44 व्या वर्षीही त्वचा नितळ ठेवण्यासाठी करते ‘या’ टिप्सचा वापर
जर तुम्हाला ग्रीन टीचा स्वाद आवडत नसेल तर त्याला पिणे टाळू नका. त्याला पिणे टाळण्यापेक्षा त्याची चव वाढवण्यावर भर द्या. याची स्वाद वाढवून याचा मनसोक्त सेवन करा आणि आरोग्याचे विविध फायद्यांचा लाभ घ्या.
एप्पल साईडर व्हिनेगरच्या साहाय्याने ग्रीन टीची चव वाढवता येते. ग्रीन टीमध्ये एप्पल साईडर व्हिनेगर घातल्याने चहाला एक ताजेतवाने आणि थोडीशी आंबट चव येते. तसेच, हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते आणि पाचनक्रिया सुधारते. लिंबू ग्रीन टीमध्ये मिसळल्याने त्याला एक नैसर्गिक आणि ताजेतवाने चव मिळते. यातील व्हिटॅमिन C आपल्या प्रतिकारशक्तीला बळकट करण्यास मदत करते आणि शरीरातील टॉक्सिन्स दूर करते.
ग्रीन टीमध्ये लाल द्राक्षांची फोड घातल्याने त्याची चव गोडसर आणि फळांच्या रसासारखी होते. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि शरीरातील हानिकारक घटक नष्ट होतात. जर तुम्हाला ग्रीन टीचा साधा स्वाद आवडत नसेल, तर या पदार्थांची भर घालून त्याला एक अनोखा आणि स्वादिष्ट ट्विस्ट द्या.
हे देखील वाचा : यंदाच्या नवरात्रीमध्ये ‘या’ नऊ रंगाचे कपडे करा परिधान, वाचा प्रत्येक रंगाचे महत्व
या पदार्थांचा ग्रीन टी बनवताना वापर करून त्या ग्रीन टीला आणखीन स्वाद देता येते. त्या पदार्थांमधील सगळे पोषक घटक त्या ग्रीन टीचा भाग बनतात आणि श्राईराला आणखीन पोषकतत्वे मिळवून देतात. त्या पदार्थांची चव ग्रीन टीमध्ये मिसळून एक अनोखी आणि स्वादिष्ट चव तयार करते, जी तुम्हाला नक्की आवडेल.