बॉलिवूडची बेबो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे रहस्य नुकतेच उघड झाले आहे. करीना कपूर आपल्या स्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. करीना आपल्या सोशल मेडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती नेहमीच आपला स्किन केअर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
महत्त्वाची बाब म्हणजे, अनेकदा करीना काही घरगुती स्किन केअरदेखील शेअर करत असते. त्वचेच्या सौंदर्यवाढीसाठी आपल्या त्वचेची योग्य काळजी घेणे फार गरजेचे असते. मात्र प्रत्येकवेळी यासाठी बाजारातील महागडे स्किन केअर प्रोडक्टस खरेदी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला करिनाने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेले काहील्या काही स्किन केअर टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्हीही करीनाप्रमाणे नितळ आणि सुंदर त्वचा मिळवू शकता.
हेदेखील वाचा – Skincare: कच्च्या दुधापासून बनवलेले हे 5 फेस पॅक चेहरा चमकदार बनवतात, योग्य पद्धत जाणून घ्या
आपल्या सौंदर्यवाढीसाठी करीना घरात हळदी चंदनाचा फेसपॅक वापरते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी ती चंदन पावडर, किंवा ताजे चंदन वापरते त्यात, एक चिमूटभर हळद, दोन थेंब व्हिटॅमिन ई,एक चमचा दूध, या चार गोष्टी नीट मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा आणि 10-12 मिनिटे राहू द्या. हा पॅक पूर्णपणे सुकला की मग सध्या पाण्याने चेहरा स्वछ करा.
शूटिंगच्या व्यस्त वेळेपत्रकातून आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी करीना कपूर पेपर नॅपकिन फेस मास्कचा वापर करते. हे करण्यासाठी, ती कोणताही स्वच्छ पेपर नॅपकिन थंड पाण्यात भिजवते आणि चेहऱ्यावर ठेवते. यामुळे चेहरा फ्रेश आणि हायड्रेट राहतो आणि चेहऱ्यावर चमक येऊ लागते.
हेदेखील वाचा – जपानचे लोक रोज या गोष्टी फॉलो करून जगतात 100 वर्ष आयुष्य, दीर्घकाळ राहतात फिट आणि स्लिम
आपल्या त्वचला निरोगी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर फार महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावत असते. करीना कपूरदेखील आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझरचा वापर करते. ती दिवसातून दोनदा चेहरा पाण्याने धुते आणि चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावते. यामुळे अकाळी येणाऱ्या सुरकुत्या रोखण्यास मदत होतात.