
युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो. सतत होणारे खाण्यापिण्याच्या सवयींमधील बदल, अपुरी झोप, कामाचा तणाव, जंक फूडचे सेवन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे नेहमी आहारात पौष्टिक आणि पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरात प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक अॅसिड. युरिक अॅसिड ही शरीरात होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीरात साचून राहिलेले अनावश्यक घटकांचे रूप. पण शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर किडनीचे आरोग्य बिघडून जाते. शरीरात साचून राहिलेले युरिक अॅसिड मूत्राद्वारे बाहेर पडून जाते, मात्र जास्त प्रमाणात युरिक अॅसिड शरीरात साचून राहिले की आरोग्याला हानी पोहण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर लघवीला उग्र वास येऊ लागतो. पण याला अनेक कारणसुद्धा आहेत. मधुमेह किंवा आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीरात बदल होऊ लागतात. लघवीला येणारा तीव्र वास किडनीची क्षमता कमी झाल्याचे दर्शवतो. त्यामुळे लघवीला जर सतत वास येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
सांध्यांमध्ये किंवा शरीराच्या इतर अवयवांमध्ये युरिक अॅसिड वाढल्यानंतर गाठी तयार होण्यास सुरुवात होते. यामुळे संधिवाताचा उद्भवण्याची शक्यता असते. त्यातील सांध्यांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारा प्रकार म्हणजे गाऊट. यामुळे पायांच्या बोटांमध्ये आणि टाचांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. शिवाय यामुळे काहीवेळा ताप सुद्धा येतो. तीव्र सांधेदुखी होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. अन्यथा यामुळे किडनीचे नुकसान होण्याची शक्यता असते.
युरिक अॅसिडची पातळी शरीरात वाढल्यानंतर लघवीचा रंग बदलून जातो. पिवळट, ढगाळ किंवा गडद रंगाची लघवी होण्यास सुरुवात होते. लघवीचा रंग बदल्यास त्वरित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. योग्य वेळी आजाराचे निदान झाल्यास आजार बरा होण्यास मदत होते.