थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्याप्रकारची फळे उपलब्ध असतात. दैनंदिन आहारात नियमित फळे खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात नेहमीच गारवा असतो. यामुळे हाडांचे दुखणे आणि इतर दुखणी वाढू लागतात. पाठदुखी, कंबर दुखी, पाय दुखणे, गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात फळांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला शरीरातील स्नायू मजबूत राहण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
शरीरातील स्नायू मजबूत राहण्यासाठी आहारात करा 'या' फळांचे सेवन

बाजारात दोन्ही प्रकारचे अंजीर उपलब्ध असतात. त्यातील ओले अंजीर आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. अंजीर खाल्यामुळे हाडं मजबूत राहतात.

डाळिंबामध्ये प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते.

थंडीमध्ये शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी नियमित २ किंवा ३ खजूर खावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारून आरोग्याला अनेक फायदे होतील.

किवीमध्ये प्रथिनांसह, विटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. या फळाचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर पेरू उपलब्ध असतात. पेरूमध्ये असलेले प्रोटीन, विटामिन सी आणि फायबर स्नायूंच्या आरोग्यासाठी अतिशय महत्व आहे. शिवाय पेरूचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.






