
फोटो सौजन्य - Social Media
व्यक्ती लहान असो वा मोठा, जाडा असो वा बारीक, प्रत्येकाच्या शरीरासाठी प्रोटीन फार महत्वाचे असते. प्रोटीन एक असे माइक्रोन्यूट्रिएंट आहे ज्याचे सेवन प्रत्येकानेच केले पाहिजे. प्रोटीनचे पुरेपूर सेवन आपल्या शरीरातील विविध घटकांसाठी फार महत्वाचा असतो. एकंदरीत, प्रोटीनच्या भरपूर सेवनाने त्वचा, केस तसेच काही हॉर्मोन्सबद्दलचे समस्या कमी होतात. व्यक्ती एकदम निरोगी आयुष्य जगतो. आपण नेहमी पाहिले असेल कि नियमितपणे व्यायाम तसेच जिम करणाऱ्या व्यक्तींना प्रोटीनची फार काळजी असते. प्रोटीन मिळवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. विविध प्रकारचे कडधान्य तसेच प्रोटीन पावडरच्या माध्यमातून ते प्रोटीन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. एकंदरीत, शरीराला प्रोटीन देणे हा शरीर बनवण्याचा प्रमुख मार्गांपैकी एक आहे.
हे देखील वाचा : जेवणाची रंगत वाढवेल स्वादिष्ट वांग्याचं लोणचं! भाजी पाहून नाक मुरडणारे आवडीने खातील
बाजारात प्रोटीन पावडरचे अनेक ब्रॅण्ड्स उपल्बध आहेत. परंतु, त्यातील बहुतेक फार महाग आहेत. त्यामुळे आज आपण घरच्याघरी लाडूच्या आकाराचे प्रोटिन्स बॉल बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. या सोप्या रेसिपीच्या माध्यमातून बनलेले प्रोटिन्स बॉल आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटिन्स देणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या एका प्रोटीन बॉल मध्ये जवळजवळ ११ ग्राम प्रोटीन असते. याचे सेवन नक्कीच आपल्या शरीरासाठी तसेच शरीराच्या आरोग्यसाठी अतिशय उपयुक्त ठरते. चला तर मग जाणून घेऊयात, प्रोटीन बॉल बनवण्याची सोपी आणि हटके रेसिपी:
साहित्य: