फोटो सौजन्य - Social Media
Time Travel शक्य आहे की नाही? याचा उलगडा अद्याप झाला नसला तरीही अशा अनेक घटना समोर आले आहेत. त्यातील एक सर्जीची कथा! एक असा व्यक्ती जो भूतकाळातून येतो आणि त्याचे भविष्यातील फोटो सापडतात. २००६ मध्ये रस्त्यावर एक फोटोग्राफर फिरताना आढळला. दिसायला गोंधळला दिसत होता. हातामध्ये असा पत्ता होता, की ज्याला विचारेल त्या व्यक्तीला तो पत्ता ठाऊकच नसणार. कारण त्या पत्त्यात असणारे ठिकाण त्यावेळी हयात नव्हते. पण नव्हते असे म्हणता येणार नाही कारण भूतकाळात गेले तर १९५० च्या दशकात तसे ठिकाण होते.
त्या फोटोग्राफरचे नाव सर्जी असे आहे, असे एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याला पोलीस कैदीत ठेवण्यात आले होते. त्याची चौकशी केली असता. त्याचा जन्म १९३६ साली झाल्याचे तो सांगत होता. २००६ मध्ये मिळालेला तरुण, १९३६ साली कसा काय जन्मू शकतो? सगळ्यांना प्रश्न पडला. मुळात, त्याचे वयही तो २५ वर्षे सांगत होता.
त्याच्या जुनाट कॅमेरा रीळ चेक करण्यात आली तेव्हा समोर आले की त्याचे नुकतेच साखरपुढं झाले होता. त्याच्या प्रेयसीचा शोध घेण्यात आला आणि हो! ती स्त्री तिच्या सत्तरीच्या वयात हयात होती. तिला विचारले असता, तिने सांगितले की १९५० मध्ये सर्जी अचानक गायब झाला. त्याचा ठावठिकाणा कुठेच लागला नाही. पण काही वर्षांनी तिला त्याचा एक वयोवृद्ध फोटो सापडला. ती म्हणत होती की तो फोटो २०५० सालातील आहे.
सर्जीला पोलिसांच्याच नजर कैदीत ठेवण्यात आले होते. पण एकेदिवशी सर्जी अचानक गायब झाला. सगळीकडे त्याच्या शोधात अधिकारी पाठवण्यात आले पण जगाच्या कोणत्याही भागात तो सापडला नाही. काही लोक या कथेला अफवा म्हणतात तर काही लोक याला सत्य समजतात मिळालेल्या त्या फोटोजवरून आणि त्याच्या वृद्ध प्रेयसीवरून!