Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका मिनिटांत तांब्या-पितळेची भांडी होतील चकचकीत साफ फक्त घरातील या पदार्थाचा वापर करा

पुजेत वापरली जाणारी तांब्या पितळेची भांडी फार कमी वेळेतच काळीकुट्ट बनतात. आता ही भांडी साफ करण्यासाठी आपण धारदार काथ्याचा वापर करू शकत नाही कारण यामुळे भांड्यांवर ओरखडे उठू शकतात. याशिवाय ही भांडी साफ करण्यासाठी तुम्ही काही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता. याच्या मदतीने काही क्षणातच कोणतीही मेहनत न करता तुम्ही सहज भांड्यावरचे डाग आणि काळपटपणा दूर करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2024 | 06:00 AM
एका मिनिटांत तांब्या-पितळेची भांडी होतील चकचकीत साफ फक्त घरातील या पदार्थाचा वापर करा

एका मिनिटांत तांब्या-पितळेची भांडी होतील चकचकीत साफ फक्त घरातील या पदार्थाचा वापर करा

Follow Us
Close
Follow Us:

सध्या गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या सणानिमित्त बाप्पाची पूजा केली जाते. पूजेवेळी अनेक तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर केला जातो. जसे की तांब्या, पितळेची ताटं, व इतर धातूची भांडी. मात्र पूजेनंतर या भांड्यांची स्वछता राखणे फार गरजेचे असते. ही भांडी फार लवकर खराब होऊ लागतात आणि योग्य वेळी यांना साफ न केल्यास यांच्यावरील चिकट थर लवकर दूर होत नाही.

अनेकदा ही भांडी साफ करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तांब्या, पितळेची भांडी स्वछ करू शकता. मुख्य म्हणजे यात तुम्हाला अधिक मेहनतही घ्यावी लागणार नाही. पाहुण्यांच्या गर्दीत आणि उत्सवाच्या गडबडीत तुम्हाला या घरगुती टिप्सचा फार फायदा होईल. पूजेची भांडी साफ करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा वापर करू शकता, याविषयी जाणून घ्या.

हेदेखील वाचा – पारंपारीक पद्धतीने बनवा तुळशीच्या पानांचे पवित्र पाणी, डायबिटीज, बीपीसारख्या सर्व आजारांना ठेवेल दूर

व्हिनेगर, बेकिंग सोडा

यासाठी प्रथम पाण्याने भांड्यांवरील सैल मळ दूर करा. त्यांनतर एक वाटी घेऊन त्यात दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि मिसळा. यानंतर हे मिश्रण 10-15 मिनिटे भांड्यावर नीट चोळा, मग स्क्रब वापरून पाण्याने ही भांडी स्वछ धुवा. व्हिनेगरमध्ये असलेले ऍसिडिक गुणधर्म आणि बेकिंग सोडाचा स्क्रबिंग इफेक्ट हे भांड्यांवरील काळेपणा आणि मळ सहज काढून टाकतो. तांब्या-पितळेची स्वछ करण्यासाठी हा उपाय फार कामी येतो.

लिंबाचा रस आणि मीठ

लिंबामधील नैसर्गिक ऍसिड आणि मीठाचा स्क्रबिंग गुणधर्म भांड्यांवरचा चिकट थर दूर करण्यास आणि यावरील चिवट डाग काढण्यास मदत करतात. यासाठी एका वाटीत लिंबाचा रस घेऊन त्यात 1-2 चमचे मीठ घाला आणि मिसळा. मग या मिश्रणाच्या मदतीने पूजेची भांडी घासून साफ करा. याच्या मदतीने भांड्यांवरील चिवट-चिकट डाग अगदी सहज दूर होतात. लिंबाचे नैसर्गिक गुणधर्म धातूंच्या भांड्यांवरील गंज देखील कमी करतात.

हेदेखील वाचा – वयाच्या चाळिशीतही 25 वर्षांचे दिसाल! फक्त हे अनोखे घरगुती उपाय करून पहा

साबणाऐवजी करा राखेचा वापर

पूर्वीच्या काळी लोक भांडी साफ करण्यासाठी राखेचा वापर करत असायचे. राखेतील गुणधर्म भांडी स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे भांड्यावरील कठीण डाग आणि चिकटपणा सहज दूर होतो. तसेच राख नैसर्गिक असल्यामुळे भांडी गुळगुळीत व स्वच्छ राहतात. यासाठी एका वाटीत थोडी राख घ्या आणि यात हलके पाणी टाका आणि याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट सर्व भांड्यांना लावून भांडी स्वछ करा.

Web Title: Tips to clean copper and brass utensils at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये ऑटिझमचे प्रमाण कमी का? जाणून घ्या ‘फीमेल प्रोटेक्टिव्ह इफेक्ट’ आणि जनुकीय गुपित
1

मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये ऑटिझमचे प्रमाण कमी का? जाणून घ्या ‘फीमेल प्रोटेक्टिव्ह इफेक्ट’ आणि जनुकीय गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.