Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा 'हे' सोपे उपाय
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, मानसिक ताण, जंक फूडचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीराच्या सर्वच अवयवांवर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा लिव्हरसबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. पोटात दुखणे, वारंवार अपचन होणे इत्यादी अनेक लक्षणांकडे सतत दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे लिव्हर आतून पूर्णपणे खराब होऊन जाते. लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी साठून राहण्यास सुरुवात झाल्यानंतर लिव्हर योग्य प्रकरे डिटॉक्स होत नाही. लिव्हरमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. याशिवाय दारू किंवा अमली पदार्थांच्या सेवनामुळे लिव्हर खराब होऊन जाते. लिव्हर खराब झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होण्यासोबतच शरीर सुद्धा डिटॉक्स होईल.(फोटो सौजन्य – istock)
वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू
निरोगी शरीर आणि सुंदर त्वचेसाठी अनेक लोक पपईचे सेवन करतात. पपईमध्ये असलेले विटामिन सी त्वचा कायमचह हेल्दी आणि ग्लोइंग ठेवतात. पपईसोबतच पपईच्या बियासुद्धा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. पपईच्या बियांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित पपईच्या बियांची पावडर पाण्यात मिक्स करून खाल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील. याशिवाय तुमचे शरीर सुद्धा स्वच्छ होईल.
कायमच चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात.लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी सूर्य उगवण्याच्या एक तास आधी झोपेतून उठावे. तसेच दुपारच्या वेळी १२ ते २ च्या वेळ जेवण करावे आणि रात्री ७ च्या आधी जेवल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.
यकृताचे रोग म्हणजे काय?
यकृताचे रोग म्हणजे यकृताच्या कार्यामध्ये बिघाड किंवा यकृताला होणारी इजा.यामध्ये फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस (hepatitis), सिरोसिस (cirrhosis) आणि यकृताचा कर्करोग (liver cancer) यांचा समावेश होतो.
यकृताचे रोग कशामुळे होतात?
अल्कोहोलचे अतिसेवन, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, काही औषधे, विषाणूजन्य संसर्ग (viral infections), आणि अनुवांशिक कारणे यकृताच्या रोगांसाठी कारणीभूत ठरू शकतात, असे हेल्थडायरेक्टने (Healthdirect) नमूद केले आहे.गैरआहार आणि जंक फूडचे जास्त सेवन देखील यकृतासाठी हानिकारक आहे.
कोणत्या पदार्थांमुळे यकृताचे आरोग्य सुधारते?
हिरव्या पालेभाज्या, सॅल्मन आणि मॅकेरल सारखे चरबीयुक्त मासे, हळद, ग्रीन टी, आणि कॉफी यकृतासाठी फायदेशीर आहेत.