ज्याप्रमाणे आरोग्याची काळजी घेतली जाते तशीच काळजी नखांची घेणं गरजेचं आहे. नखांमुळे हाताचे सौंदर्य वाढत. शरीराप्रमाणे उन्हाळ्यात नखांची काळजी घेणं आवश्यक आहे. नखांमुळे हाताचे सौंदर्य वाढत. उन्हाळ्यात जर नखांची योग्य ती काळजी घेतली नाहीतर नख कमकुवत आणि खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे नखांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्वचा आणि केसांपेक्षा नखांची काळजी घेणं जास्तच सोपं आहे. मजबूत आणि निरोगी नख ठेवण्यासाठी कमीत कमी आठवड्यातून दोनदा नखं कापणं आवश्यक आहे. नख वाढल्यानंतर त्यांच्यामध्ये घाण तशीच साठून राहते. त्यामुळे नखं आठवड्यातून दोनदा कापली पाहिजेत.
नख कापत असताना क्युटिकल्स कापणे टाळलं पाहिजे, कारण यामुळे नखांचे नुकसान होते. नख कपात असताना नेलकटरचा वापर करून नख कापली पाहिजेत यामुळे नखांना कोणतीही हानी पोहचत नाही. पण योग्यरित्या नखांची काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल काही टिप्स आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
[read_also content=”बदाम दुधाचे फायदे काय आहेत? कोणत्या वेळी पिणे फायदेशीर? https://www.navarashtra.com/lifestyle/what-are-the-benefits-of-almond-milk-at-what-time-is-it-beneficial-to-drink-534954.html”]
हात स्वच्छ ठेवणे:
नखांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे फार आवश्यक आहे. नखे स्वच्छ करण्याआधी हात स्वच्छ करा. त्यानंतर नख कापण्यासाठी एसीटोन फ्री नेल पॉलिश रिमूव्हर वापरा. पण हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टूथब्रशवर साबण लावून नख घासली तरी चालेल.
नखे हायड्रेशनची काळजी घेणे:
नख स्वच्छ धुवून झाल्यानंतर नख हायड्रेट करणं आवश्यक आहे. त्यामुळे दररोज नखांना तेल आणि मॉइश्चरायझर लावा. उन्हामुळे कोरडी झालेली नख व्यवस्थित करण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे बंधनकारक आहे. यामुळे नखातील ओलावा टिकून राहतो. नख निर्जिव होत नाहीत. सतत नख तुटण्याची समस्या कमी होऊन नख लवचिक बनतात.
नखांची काळजी घेण्यासाठी ही साधने वापरा:
[read_also content=”लसणीच्या सालीचे आहेत आश्चर्यकारक फायदे, त्वचेसंबंधित समस्या होतील दूर https://www.navarashtra.com/lifestyle/garlic-peel-has-amazing-benefits-will-cure-skin-related-problems-nrsk-535103.html”]
योग्य आहार घेणे:
शरीरासोबतच नखांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आहारात कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे पोषक यांचा समावेश करा. दररोज निरोगी आहार करा. तसेच भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील.