फोटो सौजन्य - Social Media
मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर (MBC) च्या उपचारांमध्ये भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवनव्या प्रगत पद्धती येत आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, भारतात सुमारे 60% रुग्णांचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर होते. ही आकडेवारी वैद्यकीय आणि जागरूकता तूट दर्शवते. गेल्या काही वर्षांमध्ये मेटास्टॅटिक कॅन्सरच्या उपचारांमध्ये सातत्याने लागलेल्या नवनव्या शोधांमुळे प्रगत उपचारांचे नवनवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. HER2- पॉझिटिव्ह आणि हार्मोन रिसेप्टर-पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर्ससाठीच्या न्यू-जनरेशन औषधांनी अभूतपूर्व अशी परिणामकारकता दर्शविली आहे. ही उपचारपद्धती कॅन्सरग्रस्त पेशींवर हल्ला करते तर निरोगी ऊतींना सुरक्षित ठेवते, ज्यामुळे दुष्परिणामांचे प्रमाण किमान पातळीवर येते आणि रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारतो. या प्रगत उपचारपद्धतींमुळे, अनेक रुग्ण कोणत्याही लक्षणीय अडथळ्यांविना बऱ्यापैकी दीर्घ आयुष्य जगत आहेत.
ट्रिपल-निगेटिव्ह मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर या उपचारांच्या दृष्टीने सर्वात अवघड अशा उपप्रकाराच्या बाबतीतही यावर्षी क्रांतिकारी प्रगती झाल्याचे दिसून आले आहे. या उपचारपद्धतीमधील रोगप्रतिकार यंत्रणेला कर्कपेशी शोधण्यास मदत करणाऱ्या इम्युन चेकपॉइंट्स इनहिबिटर्सच्या आशादायी परिणामांपैकी PD-1 आणि PD-L1 ब्लॉकर्सनी कर्कपेशींना मिळणाऱ्या शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा प्रतिसाद सक्रिय करण्याच्या बाबतीत नक्कीच आश्वासक काम केले आहे. प्रत्येक रुग्णाच्या ट्यूमरच्या स्वरूपानुसार तयार केलेल्या वैयक्तीकृत लशी आशेचा नवा किरण म्हणून उदयास येत आहेत व जिथे पारंपरिक उपचारपद्धती आधीच अपयशी ठरतात अशा ठिकाणी ठोस प्रतिसाद पुरवित आहेत.
AI आणि प्रीसिशन मेडिसीन
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित निदानामुळे ट्यूमरचे अचूक विश्लेषण करता येते. यामुळे वैयक्तिकृत उपचार योजना आणि आजाराचा फैलाव रोखणे शक्य झाले आहे. भारतात, सेंटर फॉर फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशनसारखे उपक्रम शहरी व ग्रामीण भागांत AI तंत्रज्ञानाने उपचार सुधारत आहेत.
नेक्स्ट-जेन डायग्नोस्टिक्स
उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादावर देखरेख ठेवणे आणि मेटास्टॅसिसचे (कर्कपेशींचा मूळ जागेवरून इतरत्र फैलाव होणे) लवकरात लवकर निदान हे MBC च्या व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक आहेत. यावर्षी रक्तात अभिसरित ट्यूमर DNA चे विश्लेषण करणाऱ्या लिक्विड बायोप्सीज- मिनिमली इन्व्हेजिव्ह चाचण्या प्रगत निदानपद्धतींचा आधारस्तंभ म्हणून उदयास आल्या आहेत. खुद्द हाय-रेझोल्युशन इमेजिंग तंत्रज्ञानांनीही आजाराच्या फैलावाचा मागोवा घेण्याच्या तंत्रामध्ये प्रगती केली आहे व वेळच्या वेळी वैद्यकीय हस्तक्षेप होण्यास आवश्यक असलेला निदानातील अभूतपूर्व अचूकपणा साध्य केला आहे.
या नव्या शोधांमुळे मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर तंत्रज्ञान व उपचारपद्धतींद्वारे मिळणाऱ्या उपचारांना आणखी नवे रूप मिळणार आहे. मूळात आयुष्य लांबविण्याच्या हेतूने लावल्या गेलेल्या या शोधांमुळे मेटास्टॅटिक कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आशेची आणि सन्मानाची भावना पुनर्स्थापित केली आहे. इम्युनोथेरपीमध्ये AI-संचलित प्रीसिशन मेडिसीनने तयार केलेल्या नव्या वाटांपासून ते या वर्षी उचलल्या गेलेल्या मोठ्या पावलांपर्यंत विविध प्रयत्नांतून आणखी उज्ज्वल भविष्यासाठीचा मंच सिद्ध झाला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुकंपेच्या भावनेतून केली जाणारी देखभाल यांच्या सहयोगातून मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर एका अशा स्थितीमध्ये परिवर्तित होत आहे, जिथे रुग्णांना प्रदीर्घ आणि अधिक चांगले आयुष्य जगता येणे शक्य आहे.