HMPV आजार काय आहे, काय आहेत लक्षणे
अजूनही जगभरात करोनाची भीती कायम आहे आणि आता चीनमध्ये पुन्हा एकदा एका नव्या् गूढ आजाराने थैमान घातले असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा लोकांवर या आजाराची नवी दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. चीनमधील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरलेली असून अनेक ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, स्मशानभूमीत जागेची कमतरता भासत आहे.
ही परिस्थिती लोकांना कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्याची आठवण करून देत आहे. प्रश्न पडतो की हा आजार कोणता आहे, किती धोकादायक आहे आणि जगाला पुन्हा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल का? चीनी मीडिया आणि आरोग्य तज्ञांच्या मते, यावेळी समस्येचे केंद्र ‘ह्युमन मेटा-न्युमो व्हायरस (एचएमपीव्ही)’ आहे. हा एक विषाणू आहे, ज्यामुळे प्रामुख्याने श्वसनाच्या समस्या उद्भवतात. हा विषाणू मुलांवर आणि वृद्धांना सर्वात जास्त प्रभावित करतो, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. हा विषाणू कोरोनासारखा धोकादायक नसून त्याची लक्षणे आणि वेगाने पसरण्याची क्षमता हा चिंतेचा विषय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे (फोटो सौजन्य – iStock)
RSV आणि Influenza चा देखील कहर
HMPV व्यतिरिक्त, इतर विषाणू देखील चीनमध्ये पसरत आहेत, त्यापैकी RSV (रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस) आणि इन्फ्लुएंझा प्रमुख आहेत. हे सर्व विषाणू एकत्रितपणे संसर्गाचे प्रमाण वाढवत आहेत आणि परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहेत. चीनमध्ये सध्या अत्यंत बिकट परिस्थिती असून अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत असं चित्र दिसून येत आहे. तर यामुळे जगभरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनानंतर आता आणखी एका महामारीने काढले डोके वर; चीनमध्ये ‘त्या’ व्हायरसने माजवला हाहाकार
HMPV ची लक्षणे
काय आहेत लक्षणे
HMPV ची लक्षणे खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास लागणे आणि अशक्तपणा यासारख्या सामान्य सर्दीप्रमाणे सुरू होतात. परंतु यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये, विशेषत: लहान मुले आणि वृद्धांमध्ये न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होऊ शकते. डॉक्टरांच्या मते, या विषाणूवर सध्या कोणतीही विशिष्ट लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्याचे उपचार केवळ लक्षणे नियंत्रणाच्या आधारे केले जात आहेत.
24 तास रूग्णालय कार्यरत
चीनमधील अनेक मोठ्या शहरांमधील रुग्णालये क्षमतेपेक्षा जास्त भरलेली आहेत. डॉक्टर आणि परिचारिका २४ तास कार्यरत आहेत. स्मशानभूमीत मृतदेहांची संख्या वाढत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. एचएमपीव्ही आणि इतर विषाणूंचा प्रभाव सध्या प्रादेशिक स्तरापुरता मर्यादित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, इतर देशांनी यावर लक्ष ठेवून त्यांच्या आरोग्य सेवा सज्ज ठेवणे गरजेचे आहे.
2001 मध्ये पहिल्यांदा शोध
HMPV चा पहिल्यांदा शोध हा 2001 मध्ये लागला, एका डच शोधकर्त्याने श्वासाशी संबंधित त्रास असणाऱ्या काही मुलांचे सँपल घेतले होते. मात्र हा व्हायरस गेल्या 6 दशकांपासून अस्तित्वात असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व हंगामात हा व्हायरस असतो मात्र याचा सर्वाधिक धोका हा हिवाळ्याच्या हंगामात असल्याचे सांगण्यात येते
दातांचा पिवळा थर काढून टाकण्याचा रामबाण उपाय, मोत्यांसारखे होतील दात; वापरा केवळ 1 पान
सोशल मीडियाद्वारे माहिती
⚠️ BREAKING:
China 🇨🇳 Declares State of Emergency as Epidemic Overwhelms Hospitals and Crematoriums.
Multiple viruses, including Influenza A, HMPV, Mycoplasma pneumoniae, and COVID-19, are spreading rapidly across China. pic.twitter.com/GRV3XYgrYX
— SARS‑CoV‑2 (COVID-19) (@COVID19_disease) January 1, 2025
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.