नथ म्हणजे महाराष्ट्रीयन साजशृंगार, नथीचे प्रकार
जेव्हा आपण पारंपारिक महाराषट्रीयन दागिन्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो तो महाराष्ट्रीयन नथ.महाराष्ट्रीन साजशृंगारामध्ये नथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नथ नव्या नवरीला एक मराठमोळा राजेशाही आणि शोभिवंत असे सौंदर्य देते. पिवळे पांढरे धम्मक मोती त्यात लाल, हिरव्या आणि पांढऱ्या मोती नथीमध्ये गुंफलेले असतात. नऊवारी साडीवर नथ घातल्याशिवाय श्रृंगार अपूर्ण वाटतो. त्यामुळे नऊवारीवर आवर्जून मराठमोळी नथ घातली जाते. याशिवाय कोणत्याही शुभ प्रसंगी, लग्न किंवा मंगलकार्यात स्त्रिया आवडीने नथ घालून मिरवतात.
नथीमुळे स्त्रीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. मात्र नथ आता केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तसेच या महाराष्ट्रीयन नथींना मुखंडा देखील म्हणतात ज्यांचे रचना वेगवेगळी आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करणारी ही नथ अनेक प्रकारची असते. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये नथीच्या वेगवेगळ्या प्रकाराची नावे आणि त्या कशा दिसतात हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ तुम्ही देखील एकदा पाहून घ्या आणि तुम्हाला एखादी नथ आवडली तर ती खरेदी करा.
नथीचे प्रकार
कारवारी नथ– जीचा उगम महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील सांस्कृतिक पंरपरेतून झाला. या नथीचे नाव कर्नाटकमधील कारवार गावावरून पडले आहे. या नथीच्या रचनेला थोडासा दक्षिणेचा स्पर्श असून हीला सोन्याचा मुलामा असतो. ही नथ बारा मोतींनी जोडलेली असते.
पुणेरी नथ– या नथीची रचना कारवारी नथीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. या नथीला 2 फुलासारखी डिझाईन असते. नथीमध्ये वरच्या बाजूला मोठा खडा आणि तळाशी मोत्यांनी तिला गुंफलेली असेत. तसेच मोत्यांचा आकार मोठा असतो. ही नथ गोल नाक चेहऱ्यावर अतिशय शोभून दिसते. जड दागिने घातले असतील तर ही नथ तुमच्यावर खूप सुंदर दिसेल. आणि तुमचा थाटही पुणेरी पद्धतीचा उठावदार होईल.
बाजीराव मस्तानी नथ– संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील प्रियंका चोप्राच्या काशीबाई या पात्रामुळे ही नथ लोकप्रिय झाली. प्रियांकाचा चित्रपटातील महाराष्ट्रीयन लूक जी हुबेहुब काशीबाई दिसली होती. ही नथही पुणेरी नथ सारखीच आहे. पण त्याची रचना खूप श्रीमंत म्हणजे तिचा थाट पेशवाईप्रमाणे असल्याचे सांगितले जाते.
पेशवाई नथ- ही नथ पेशवाई संस्कृती, कला आणि सर्जनशील प्रेमासाठी ओळखली जाते. या नथीमध्ये पेशव्यांची कला, संस्कृती आणि सर्जनशीलता पाहायला मिळते. ही नथ मोत्यांच्या दागिन्यांवर जास्त खुलून दिसते. महाराष्ट्रामध्ये पारंपारिक कार्यक्रम, सण-समारंभांसाठी परिधान केली जाते.
बानु नथ -‘जय मल्हार’ या मालिकेतील बानू या व्यक्तिरेखेपासून या नथीच्या उगम झाला. सिरीयलमध्ये बानू सामान्य महाराष्ट्रीयन नथ परिधान करते जी अर्धवर्तुळाकार आहे. या नथीमध्ये खड्याचा एकच थर गुंफलेला असून तळाशी मोती टांगलेला आहे. ही नथ सामान्य महाराष्ट्रीयन नथांपेक्षा थोडी लहान आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये मारवाडी नथ, मोती नथ, महाराष्टीयन नथ, मल्हारी कारवारी नथ याबद्दल ही देण्यात आले आहे.