सांध्यांमध्ये साचलेले युरिक अॅसिड कायमचे पडून जाईल बाहेर!
दैनंदिन आयुष्यात अनेकांना वयाच्या चाळीशीमध्येच सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. गुडघे, कंबर, पाठ इत्यादी दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक वेगवेगळे उपाय केले जाते. शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी हाडांमधील वेदना वाढवण्यास कारणीभूत ठरते. युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर संधिवात, सांधे दुखणे, चालताना किंवा वर उठताना वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय काहींच्या सांध्यांना सूज सुद्धा येते. त्यामुळे शरीरात वाढलेल्या युरिक अॅसिडकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपाय करून आरोग्याची काळजी घ्यावी. ही समस्या आणखीनच वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
सांध्यांमध्ये वाढलेले युरिक अॅसिड शरीरातील हाड ठिसूळ करून टाकतो. त्यामुळे हाडांमधील वेदना वाढू लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आहारात आलं आणि ओव्याचा समावेश करू शकता. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. आज आम्ही रोज सकाळी उठल्यानंतर आलं ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास पचनक्रिया कायमच निरोगी राहील.
आजीच्या बटव्यातील औषधांमध्ये ओव्याला विशेष आहेत. कारण पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर ओवा आणि गरम पाणी पिण्यास दिला जातो. यामुळे पोटात वाढलेल्या वेदना कमी होतात आणि पोट स्वच्छ होते. ओवामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे सांध्यांमध्ये वाढलेली सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. याशिवाय आल्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध असलेले आल्याचे पाणी सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी मदत करतो. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल.
शरीरात युरिक अॅसिड वाढल्यानंतर सांध्यांमध्ये क्रिस्टल्स साचू लागतात. यामुळे सांध्यांमध्ये वेदना होणे किंवा सूज येण्याची शक्यता असते. या वेदनांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी ओवा आणि आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यास लघवीतून शरीरात जमा झालेले युरिक अॅसिड बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल.
Cholesterol वाढल्याची लक्षणेच दिसत नाहीत, आढळतेय सर्वात मोठी समस्या
शरीरातील अतिशय महत्वाचे अवयव म्हणजे किडनी आणि लिव्हर. हे अवयव कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात ओवा आल्याचे किंवा पाण्याचे सेवन करावे. यामुळे किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत. तसेच शरीरात साचून राहिलेले हानिकारक विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल. त्यामुळे नियमित आलं आणि ओवाच्या पाण्याचे सेवन करावे.