फोटो सौजन्य - Social Media
भारतीय खाद्य परंपरेत डाळ भाताला टीम लीडर म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. डाळ भातामध्ये असणारे पोषकतत्व आणि डाळ भाताचा स्वाद काही औरच आहे. अवघ्या जगाला हेवा वाटावा अशी चव या खाद्यामध्ये आहे. महत्वाचे म्हणजे हा हेवा फक्त बोलण्यापुरती राहिलेला नाही. डाळ भाताने खरंच आपल्या भारतीय खाद्य परंपरेचे नाव साता समुद्रा पार न्हेले आहे. US न्यूट्रिशिअन कॉन्फरन्सने डाळ भाताला जगातील सगळ्यात पौष्टिक अन्न म्हणून घोषित केले आहे.
डाळ भातामध्ये विविध पोषणतत्त्वे असतात. या पोषणतत्वांमध्ये प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्व-A, जीवनसत्त्व-D, जीवनसत्त्व-E, जीवनसत्त्व-B1, जीवनसत्त्व-C, जीवनसत्त्व-K आणि अँटीऑक्सिडंटचा समावेश आहे. तसेच स्वादामध्ये डाळ भाताला तोड नाही. घरामध्ये कितीही पंच पक्वान्न बनलेले असू दे पण जो पर्यंत डाळ भाताचा एक शीत पोटाखाली उतरत नाही तोपर्यंत आपले जेवण संपूर्ण झाले याची खात्री होत नाही.
डाळ भातामध्ये आढळणारे पोषणतत्व आरोग्याच्या पूर्ण विकासाला कारणीभूत असतात. आताच्या काळी अनेक जंक फूड आहेत, ज्यांचे सेवन करून आताची पिढी सतत आजारी पडते. पण पूर्वीच्या पिढीमध्ये साधं डाळ भात सेवन केल्याने आजारी पाडण्याचे प्रमाण कमी होते. डाळ भातामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. जीवनसत्त्व-B, जीवनसत्त्व-E, लोह, कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात. याच्या साहाय्याने शरीर मांसपेशींची बांधणी करते. त्यात काही जखमा असतील तर त्यांच्यात सुधार करते. तसेच डाळ भातामध्ये असणारे फायबर पचनतंत्राला निरोगी ठेवण्याचे काम करते.
फायबर आणि प्रथिनांचे सेवन करणे वेट लॉससाठी गरजेचे आहे. डाळ भातामध्ये हे जास्त प्रमाणात उपल्बध असते, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही. परिणामी, वेट लॉस करण्यामध्ये मदत होते. यामध्ये असणारे फायबर आणि प्रथिने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तसेच डाळीत आढळणारा फोलेट हा पदार्थ हृदयविकाराचा धोका कमी करून हृदयाला निरोगी ठेवण्याचे काम करतो. आपण तर नेहमीच ऐकलं असेल कि पोटभरून डाळ भात खाल्ल्यानंतर छान झोप लागते. हे खरे आहे कि डाळ भात खाल्ल्याने झोपेच्या गुणवत्तेमध्ये सुधार होतो. मानिसक आरोग्यसाठी हे उत्तम आहे. यामुळे मेंदू अधिक चांगले कार्य करतो आणि ताण-तणाव, नैराश्य यांसारख्या समस्या टाळता येतात. हा आहार घेतल्याने आळस कमी होतो आणि शरीर सक्रिय राहते.