फॅटी लिव्हर असल्यास काय खाणे टाळावे
फॅटी लिव्हर रोग एक सामान्य परंतु गंभीर आरोग्य समस्या बनत आहे. जेव्हा यकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा होते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास यकृताचा दाह (हिपॅटायटीस) आणि लिव्हर सिरोसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात. विशेषत: ग्रेड-2 फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
ग्रेड 2 फॅटी लिव्हर ही अशी स्थिती आहे जेव्हा यकृतातील चरबीचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असते आणि अल्ट्रासाऊंडवर स्पष्टपणे दिसून येते. अशा परिस्थितीत यकृताच्या कार्यावर हळूहळू परिणाम होऊ लागतो. असंतुलित आहार, लठ्ठपणा, मद्यपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे ही स्थिती उद्भवते (फोटो सौजन्य – iStock)
फॅटी लिव्हरमुळे चेहरा खराब झाला आहे? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वचेची घ्या काळजी
कोणत्या पदार्थांपासून दूर रहावे
कोणते पदार्थ खाणे टाळावे
आपण काय खावे?
कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा
Fatty Liver सडवून टाकतील 5 पदार्थ, डाएटमध्ये कधीच करू नका समाविष्ट
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
फॅटी लिव्हरची काळजी कशी घ्यावी
ग्रेड 2 फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांनी नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि यकृत कार्य चाचण्या कराव्यात. यासोबतच नियमित व्यायाम आणि वजन कमी करणेही महत्त्वाचे आहे. चुकीची राहणीमानाची पद्धती, अयोग्य वेळी खाणे या सगळ्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास हा तरूणांमध्येही वाढत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे वेळीच याकडे लक्ष द्यावे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.