डेड स्किन घालवण्यासाठी तुरटी आणि लिंबाचा 'या' पद्धतीने करा वापर
सर्वच महिलांना चमकदार आणि गोरीपान त्वचा हवी असते. पण निरोगी त्वचेसाठी काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. महिला किंवा पुरुष त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे काहीकाळ त्वचा खूपच सुंदर आणि ताज़ीटवटवीत दिसते. मात्र कालातंराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य त्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा. तसेच त्वचेला सूट होतील असे प्रॉडक्ट वापरावे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर केला जात आहे. तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग, पिंपल्स, वांग, डेड स्किन काढून टाकण्यासाठी मदत करतात. तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-बायोटिक्स, अॅंटी-फंगल गुणधर्म आढळून येतात. शिवाय त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात. तुरटीचा वापर केल्यामुळे त्वचा आणि केसांसंबधित समस्या दूर होतात. तुरटीसोबतच लिंबाचा रस मिक्स करून लावल्यास त्वचेला अनेक फायदे होतात. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. चला तर जाणून घेऊया लिंबू आणि तुरटी मिक्स करून लावल्यामुळे त्वचेला होणारे फायदे.
त्वचेवर डेड स्किन काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस आणि तुरटीचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि चेहरा उजळदार आणि सुंदर दिसेल. तुरटीच्या वापरामुळे त्वचा स्वच्छ होते. यासाठी लिंबाच्या रसात तुरटी पावडर मिक्स करून त्वचेवर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. 2 मिनिटं ठेवून त्वचा पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल.
चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यासाठी लिंबाच्या रसात तुरटी मिक्स करून लावावी. यामुळे त्वचेचा रंग बदलतो आणि त्वचा अधिक खुलून दिसते.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तुरटीचा वापर त्वचेसाठीच नाहीतर केसांसाठी सुद्धा केला जातो. तुरटीमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या मुळांसाठी आवश्यक आहे. यामुळे केसांची मूळ अतिशय मजबूत होतात. शिवाय पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते. केसांना लिंबू आणि तुरटीचे मिश्रण लावल्यास केस मुलायम आणि सॉफ्ट होतात.