Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“वॉक इन माय शूज” एम.एस. रुग्णांच्या अदृश्य संघर्षांवर प्रकाश

मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) रुग्णांच्या अदृश्य वेदनांना समाजासमोर आणण्यासाठी रोश फार्मा इंडिया आणि MSSI यांनी “Walk In My Shoes” हा जनजागृती उपक्रम सुरू केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 23, 2025 | 06:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात कोट्यवधी लोक आणि भारतात जवळपास 2 लाख नागरिक मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) या जीवनमर्यादित करणाऱ्या न्यूरोलॉजिकल आजाराशी झुंज देत आहेत. चालणे, स्वयंपाक, आंघोळ किंवा लेकराला उचलणे यांसारखी साधी कामेसुद्धा या रुग्णांसाठी डोंगर चढण्याइतकी कठीण ठरतात. पण त्यांची ही झुंज बहुतेक वेळा समाजापासून अदृश्य राहते. या संघर्षांना आवाज देण्यासाठी रोश फार्मा इंडिया आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (MSSI) यांनी “Walk In My Shoes” हा जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे.

साखर गुळाचा वापर न करता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी बनवा खजूर मोदक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

या मोहिमेअंतर्गत सिम्युलेशन झोन तयार करण्यात आला असून, भेट देणाऱ्यांना एम.एस. रुग्णांना भेडसावणारी चार प्रमुख लक्षणे  संतुलन हरवणे, स्नायूंच्या हालचालींवर परिणाम, अस्पष्ट दिसणे आणि संवेदनाशक्ती कमी होणे. प्रत्यक्ष अनुभवता येतील. हा झोन 22 ते 24 ऑगस्टदरम्यान मुंबईतील फिनिक्स मार्केटसिटी आणि नवी दिल्लीतील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये सुरू राहणार आहे. “अनुभवातून शिक्षण” या संकल्पनेतून एम.एस. रुग्णांच्या आयुष्याची खरी झलक येथे मिळणार आहे.

MSSI सचिव संदीप चिटणीस यांनी निदर्शनास आणले की, एम.एस. हा अदृश्य आजार असल्यामुळे रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र मिळत नाही आणि सरकारी योजनांपासून ते वंचित राहतात. त्यामुळे आरोग्य विमा व RPWD कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करून रुग्णांना न्याय मिळावा, हे आमचे ध्येय असल्याचे ते म्हणाले. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. रमेश पाटणकर यांच्या मते, भारतात फक्त 10% एम.एस. रुग्णांनाच उच्च-प्रभावी उपचार (High-efficacy therapies) मिळतात. हे उपचार सर्वांसाठी परवडणारे आणि विमा कव्हरेजसह उपलब्ध होणे राष्ट्राच्या प्राधान्यक्रमात यायला हवे.

रोश फार्मा इंडिया सीईओ राज्जी मेधवान यांनी सांगितले की, “#WalkInMyShoes ही मोहीम केवळ जागरूकता वाढवणारी नसून सहानुभूती प्रज्वलित करणारी, रुग्णांचा आवाज बुलंद करणारी आणि आरोग्य व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचा निनाद आहे.”

Men’s Health: ‘हे’ वाचून पुरूष अंडरवेअर घालणंच सोडून देतील, तज्ज्ञांनी सांगितले कारण, पुरूषहो! चुकूनही करू नका ‘ही’ चूक

एम.एस. बहुतेक वेळा 20–40 वयोगटातील तरुणांना होतो आणि स्त्रियांमध्ये याचे प्रमाण दुप्पट-तिपटीने जास्त आहे. करिअर, कुटुंब आणि स्वप्नांच्या टप्प्यावर हा आजार जीवनमर्यादित अपंगत्वाकडे नेऊ शकतो. त्यामुळे लवकर निदान, योग्य उपचार आणि समाजातील सहानुभूती हीच एम.एस. रुग्णांसाठी खरी जीवनरेषा ठरते.

Web Title: Walk in my shoes sheds light on the invisible struggles of ms patients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • daily health

संबंधित बातम्या

रुद्राक्षाच्या माळेला फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील आहे मोठं महत्व , काय आहेत याची शास्त्रीय कारणं ?
1

रुद्राक्षाच्या माळेला फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील आहे मोठं महत्व , काय आहेत याची शास्त्रीय कारणं ?

बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय
2

बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…
3

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

दिर्घायुषी व्हायचंय ? मग ‘या’ भाज्या दर आठवड्याला खायलाच पाहिजे
4

दिर्घायुषी व्हायचंय ? मग ‘या’ भाज्या दर आठवड्याला खायलाच पाहिजे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.