हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे
प्रत्येक व्यक्ती कायमच हेल्दी आणि तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी सतत काहींना काही करत असतो. कधी आहारात बदल केला जातो तर कधी दैनंदिन जीवनातील सवयींमध्ये अनेक बदल केले जातात. मात्र चुकीच्या सवयी अंगीकारामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. रोजच्या आहारात सतत बर्गर, पिझ्झा, समोसे, मैद्याचे पदार्थ इत्यादी जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. याशिवाय अतितिखट आणि तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब वाढू लागतो. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहते, ज्यामुळे हृदयाच्या नसा ब्लॉक होऊन जातात. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर योग्य रक्तभिसरण व्यवस्थित होत आणि ऑक्सिजन पुरवठा कमी होतो.(फोटो सौजन्य – istock)
वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त भीती असते. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याच्या काहीदिवस आधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. पण या लक्षणांकडे ऍसिडिटी किंवा सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दिवसभर काम करून घरी थकून आल्यानंतर काहींना सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. पण हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात सतत थकवा जाणवणे किंवा चक्कर येते. चक्कर आल्यानंतर लवकर शुद्ध न आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही. ज्यामुळे कमजोरी, डोके फिरणे किंवा बेशुद्ध होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे तुमच्या शरीरात वारंवार ही लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
हार्ट ब्लॉकेज किंवा हृद्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर पायांमध्ये सुद्धा लक्षणे दिसून येतात. पायांच्या टाचांमध्ये जडपणा जाणवणे, पायांच्या टाचांमध्ये वेदना होणे, पायांना सूज येणे, टाचांवर दाब जाणवणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. शरीरात रक्त व्यवस्थित पंप न झाल्यामुळे पायांच्या टाचांमध्ये वेदना वाढतात.
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात सतत थकवा जाणवू लागतो. योग्य आहार किंवा झोप पूर्ण केल्यानंतर सुद्धा शरीरात थकवा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृद्य ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरात योग्य प्रकारे पोहचवत नाही, त्यावेळी शरीरातील पेशींची ऊर्जा कमी होऊन जाते. यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो.
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरातून खूप जास्त घाम येतो. खेळती हवा असलेल्या ठिकाणी बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर घाम येत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. अन्यथा कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. याशिवाय सांधेदुखी, काखेत वेदना, शरीर थंड पडणे, मळमळ उलटी इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्तनपानासंबंधित गैरसमजुतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास तज्ज्ञांचा घ्या सल्ला
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?
हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फ्रक्शन) तेव्हा येतो जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये (coronary arteries) अडथळा येतो, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि ते स्नायू मरतात.
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे कोणती?
छातीत दुखणे, दाब किंवा जडपणा जाणवू शकतो. हे दुखणे काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते आणि आराम केल्यावरही जात नाही. दुखणे हातामध्ये, पाठीमध्ये, जबड्यामध्ये, मान किंवा पोटात पसरू शकते.
हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे?
108 किंवा तुमच्या स्थानिक आपत्कालीन नंबरवर कॉल करा.घाबरल्यास, आराम करण्याचा प्रयत्न करा.