मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजारामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे आरोग्याला हानी पोहचते. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेले तणाव, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता,पोषक तत्वांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे योग्य वेळी लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हा आजार प्रामुख्याने तरुणांमध्ये वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मधुमेह हा आयुष्यभरासाठी कायमच शरीरात तसाच टिकून राहतो. याशिवाय मधुमेहासारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर कायमस्वरूपी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. मधुमेह पूर्णपणे बरा करता येत नाही. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार लघवीला जावे लागणे:
मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार लघवीला जावे लागते. रात्री झोपल्यानंतर ही समस्या खूप जास्त त्रास देते. वारंवार लघवीला होणे हे मधुमेहाचे प्रमुख लक्षण आहे. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे शरीरात ग्लूकोज प्रमाण वाढू लागते, ज्यामुळे किडनी त्याला फिल्टर करण्याचा प्रयत्न करते तेव्हा अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात साचून राहिलेले जास्तीचे ग्लूकोज लघवीवाटे बाहेर पडून जाते. त्यामुळे रात्री पुन्हा पुन्हा लघवीला जावे लागते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान होणाऱ्या बदलांमुळे वारंवार तहान लागते. मात्र मधुमेह झाल्यानंतर वर्षाच्या बाराही महिने व्यक्तीला सतत पाणी पिण्याची इच्छा होते.कितीही पाणी प्यायल्यानंतर सुद्धा तहान भागात नाही. वारंवार लघवीला जाऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. तुम्हाला जर कोणत्याही शारीरिक हालचाली न करता सतत पाणी पिण्याची इच्छा होत असेल तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेह चाचणी करून घ्यावी.
मधुमेह झालेल्या व्यक्तीला चालताना किंवा थोडस काम केल्यानंतर सुद्धा लगेच थकवा जाणवू लागतो. शरीरातील ऊर्जेची पातळी कमी झाल्यानंतर वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरामध्ये इन्सुलिनच्या कार्यात अडथळे निर्माण होऊन ग्लूकोज कोशिंकापर्यंत पोहोचू शकत नाही, अशावेळी शरीरात जास्तीचा थकवा जाणवू लागतो.
लठ्ठपणामुळे पोटावर साचलेत चरबीचे टायर, बाबा रामदेवांचा रामबाण पदार्थ करेल तुम्हाला Slim Trim
रक्तात वाढलेल्या साखरेमुळे जखमा भरण्यास जास्तीचा वेळ लागतो. कोणतीही छोटी मोठी जखम लवकर बरी होण्याऐवजी आणखीनच चिघळत जाते. ज्यामुळे मधुमेह झाल्यानंतर शरीराला कोणतीही जखम होणार नाही याची जास्त काळजी घ्यावी. ब्लड सर्कुलेशन आणि इम्यून सिस्टीम जास्त प्रभावित झाल्यामुळे शरीराला हानी पोहचते.
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह, ज्याला इंग्रजीमध्ये ‘Diabetes’ म्हणतात, रक्तातील साखरेची (Glucose) पातळी सामान्य पेक्षा जास्त वाढते.
मधुमेह होण्याची कारणे काय आहेत?
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती (Immune system) स्वादुपिंडातील (Pancreas) इन्सुलिन (Insulin) तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन कमी होते किंवा थांबते. शरीरातील पेशी इन्सुलिनला नीट प्रतिसाद देत नाहीत किंवा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही.
मधुमेह टाळण्यासाठी काय करावे?
नियमित व्यायाम करासंतुलित आहार घ्या, ज्यात फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेशअसेल.वजन नियंत्रणात ठेवाधूम्रपान आणि मद्यपान टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित आरोग्य तपासणी करा