
मकर संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात नेसा 'या' पारंपरिक साड्या
नवीन वर्षात पहिला मकर संक्रांत आला आहे. या सणाची कमालीची उत्सुकता पाहिला मिळते. मात्र, पहिली संक्रांत असो किंवा दुसरी महिलांना सण म्हटला की, साड्या खरेदी करतातच यात शंकाच नाही. मकर संक्रांतीच्या सणाला नेसण्यासाठी या साडचा अगदी परफेक्ट आहेत. या साड्या नेसल्यावर तुमचे रूप अधिकच खुलेल. या साड्या अतिशय आरामदायक आहेत आणि नेण्यासही सोप्या आहेत.(फोटो सौजन्य – pinterest)
हलव्याच्या दागिन्यांचा साजशृंगार! पारंपरिक दागिन्यांनी वाढवा सणांची गोडी, साडीवर दिसतील शोभून
सिल्क, जरी आणि कॉटन फॅब्रिकमध्ये साड्या उपलब्ध आहेत. या साड्या फॅशनेबल आणि आरामदायक अशा दोन्ही प्रकारच्या लुकसाठी योग्य आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने काळ्या रंगाची साडी तुम्ही परिधान करु शकता.
कांजीवरम ही साडीची राणी आहे. जे कारागीर स्वतःच्या हाताने तयार करतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आकर्षक, मोहक अशी ही पारंपरिक साडी आरामात घालू शकता. तसे तर यामध्ये रंगांची खूप विविधता आढळून येते. ज्यामुळे तुम्हाला गोंधळात टाकता येईल. पण, या निमित्ताने काळा शुभ मानला जातो.
टेंट ही पश्चिम बंगालची पारंपरिक साडी आहे. ही साडी लग्न आणि इतर प्रसंगी परिधान करण्यात येते. तसेच पौष संक्रांतीच्या निमित्ताने हलक्या, पातळ बॉर्डर आणि सुंदर प्रिंट असलेल्या या साड्या नेसण्याची कल्पना उत्तम आहे.
ओरिसामध्ये देखील मोठ्या उत्साहात मकर संक्रांती सण साजरा केला जातो. या सणाला तुम्ही ओरिसाची पारंपरिक बोमकाई साडी, ज्याला सोनपुरी सिल्क म्हणूनही ओळखले जाते ही परिधान करू शकता. बोमकाई साडी ही इकत प्रिंट आणि धाग्याने बनलेली एक अतिशय सुंदर साडी आहे. जे सिल्क आणि कॉटन सारख्या आरामदायक फॅब्रिकमध्ये उपलब्ध असते. ही साडी नेसायला देखील हलकी असते. तसेच ही साडी खूपच खुलून दिसते.
बनारसी साड्यांमध्ये सोन्या-चांदीचे जरी वर्क पाहायला मिळते आणि हे परिधान केलेल्या व्यक्तीचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. बनारसी साडी फक्त लग्न आणि खास प्रसंगी नेसली जाते असे अजिबात नाही. तर तुम्ही ही साडी सणावाराला देखील नेसू शकता. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला नक्की नेसा.
साडीची फॅशन नेहमीच ट्रेंडमध्ये असते. आणि मकर संक्रांतीचा सण हा सर्वोत्तम असतो. तुम्ही या साड्या परिधान करून सर्वांचे
लक्ष वेधून घेऊ शकता.
प्रत्येक महिलेच्या कपाटात असायला हव्यात ‘या’ साऊथ इंडियन साड्या, लग्न सोहळ्यात दिसेल रॉयल लुक
महाराष्ट्राची पैठणी साडी ही औरंगाबादची खासियत आहे. जी दिसायला खूप छान आणि शोभिवंत दिसते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने जरीच्या बॉर्डर, उत्तम आकृतिबंध आणि मोराच्या डिझाइन्स असलेल्या या साड्या खूपच सुंदर दिसता. यामुळे चेहरा अधिक खुलण्यास मदत होते.सणावाराच्या दिवसांमध्ये सर्वच महिला पैठणी साडी नेसायला खूप जास्त आवडते.