Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teenager वयातल्या मुलांशी वागताना पालकांनी नक्की कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?

Teenagers च्या पालकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. साधारणतः मुलं तेरा वर्षांची झाल्यानंतर त्यांना वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टींच्या समस्या देखील उद्भवतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 18, 2026 | 04:53 PM
  • Teenager वयातल्या मुलांशी वागताना पालकांनी नक्की कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
  • ‘या’ पाच गोष्टी पालक म्हणून तुम्हाला माहित असल्याच पाहिजे
Teenagers च्या पालकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. साधारणतः मुलं तेरा वर्षांची झाल्यानंतर त्यांना वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टींच्या समस्या देखील उद्भवतात. अशा वेळेला पालकांनी त्यांचं मित्र होणं जास्त गरजेचं आहे. पण आपली मुलं कोणत्या गोष्टी करत आहेत, कोणत्या गोष्टी योग्य आहेत, अयोग्य आहेत हे समजून घेण्यासाठी पालकांनी या पाच गोष्टी त्यांना शिकवायलाच पाहिजेत. आता या पाच गोष्टी कोणत्या आहेत हे आपण समजून घेऊया.

निर्णय क्षमता 

यापैकी सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलांना आत्मविश्वास देणं. आपली मुलं कोणत्याही पद्धतीचं काम योग्य पद्धतीने करू शकतात आणि तिथे कोणाशीही त्यांची कोणाशीही तुलना होत नाहीये ही गोष्ट त्यांना आत्मविश्वासाने समजावून देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर एखाद्या परिस्थितीत निर्णय घ्यायचा झालाच तर कोणताही निर्णय तू योग्यच घेशील हा आत्मविश्वास मुलांना देणं हे पालकांचं मुख्य कर्तव्य आहे. Teenager वयामध्ये मुलांना ही समस्या सर्वात जास्ती उद्भवत असते. त्यामुळे पालकांनी हा आत्मविश्वास त्यांना द्यावा.

तुलना करु नका 

दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना देण्यात येणारी जबाबदारी. आपल्या मुलाला हे करता येणार नाही ते करता येणार नाही असं पालकांनी कधीच म्हणू नये. त्यांना घरातली सर्व कामं थोडी थोडी जबाबदारीने द्यायला सुरुवात करा.जसं की, स्वतःचा पाण्याचा ग्लास उचलून ठेवणं, कपड्यांच्या घड्या घालणं या साध्या साध्या गोष्टी त्यांना जबाबदारीने करू द्या. याशिवाय कोणते निर्णय योग्य आहेत हे देखील त्यांना कळायला हवं आणि ते त्यांना तेव्हाच कळेल जेव्हा त्यांच्यावरती एक जबाबदारी येऊन पडेल.

वय वाढलं तरी नातं घट्ट ठेवा! आई-वडिलांना समजून घेण्याचे सोपे मार्ग, नातं मजबूत ठेवण्यास करतील तुमची मदत

मोकळेपणाने संवाद साधणं 

तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे Teenager वयामध्ये सहसा मुलांना नकारात्मक विचार करण्याची सवय लागून जाते. पण अशा वेळी त्यांना योग्य गोष्ट समजावून देत सकारात्मकता कशी आयुष्यात महत्त्वाची आहे हे देखील पालकांनी मुख्यत्वे करायला पाहिजे. आता म्हणजे नक्की काय? तर त्यांची कोणत्याही मुलांशी तुलना अजिबात करू नका. कारण जेव्हा तुम्ही इतरांशी तुलना करता तेव्हा ते नकारात्मक विचार चालू करायला सुरुवात करतात की ही गोष्ट मला जमत नाहीये. माझे आई वडील मला सतत बोलतायत. हे त्यांच्याबरोबर अजिबात होऊ देऊ नका.

चुका समजावून सांगणं 

या वयामध्ये मुलांना सहसा आपण ज्या गोष्टी करतोय त्या चुकीच्या आहेत हेच कळत नाही. त्यामुळे पालकांनी त्यांना न ओरडता कोणती गोष्ट योग्य आहे किंवा कोणती गोष्ट चुकीची आहे हे समजावून देणं खूप गरजेचं आहे आणि या वयात पालकांनी त्यांचं मित्र म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. मुलांच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे हे आपल्याला पालक म्हणून जाणून घेणं खूप गरजेचं आहे.कारण साधारणतः Teenager वयामध्ये त्यांना वेगवेगळे प्रश्न पडत असतात आणि याची उत्तरं आपल्याला पालक देणार नाहीत असंही त्यांना वाटत असतं. त्यामुळे त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधा. अन्यथा तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. या पाच गोष्टी पालक म्हणून तुम्ही मुलांना शिकवल्यात तर तुमचं मूल नक्कीच सकारात्मक कायम राहील आणि एक उत्तम माणूस म्हणून जगण्यास त्यांना नक्कीच मदत होईल.

Close

Web Title: What are the things that parents should keep in mind when dealing with teenagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Happy Lifestyle

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.