मासिक पाळी लवकर येण्यामागे काय कारण आहेत
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम मागील अनेक वर्षांपासून आरोग्यावर सुद्धा दिसून येत आहेत. प्रत्येक मुलीला मासिक पाळी येणे महत्वाचे आहे. मासिक पाळी येण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू महिलांच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात होते. सर्वच महिला आणि मुलींना मासिक पाळी दर महिन्यातून एकदा येते. या पाच दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड घ्यावे. शरीरात सातत्याने होणारे हार्मोनल असंतुलन, मासिक पाळीच्या वेदना, आरोग्यासंबंधित समस्या महिलांना सहन कराव्या लागतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कितीही त्रास झाला तरीसुद्धा मासिक पाळी प्रत्येक महिन्याला येणे बंधनकारक आहे. पण हल्लीच्या मुलींना फार कमी वयात मासिक पाळी येऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
मुलींना मासिक पाळी येण्यासाठी ठराविक वेळ असतो. 12 ते 13 वर्षादरम्यान मुलींना मासिक पाळी येते. मात्र मागील काही वर्षांपासून मुलींना 9 ते 10 वयातच मासिक पाळी येऊ लागली आहे. इतक्या कमी वयात मासिक पाळी येऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वयाच्या 10 किंवा 11 वर्षात मासिक पाळी आल्यास येणाऱ्या पुढील काळात महिलांना आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचं सामना करावा लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय
मासिक पाळी लवकर येण्यामागे काय कारण आहेत
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. लहान मुलींना कमी वयातच मासिक पाळी येण्यामागे अनेक कारण आहेत. यावर अभ्यासात केलेल्या संशोधनानुसार, रोजच्या वापरातील केमिकल प्रॉडक्टचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच मुली या वस्तूंच्या लवकर संपर्कात येतात, ज्यामुळे मासिक पाळी लवकर येण्याची शक्यता असते.
सर्वच महिला आणि मुली सुंदर दिसण्यासाठी काहींना करत असतात. पण कमी वयात डिटर्जंट, सेंट, साबन यांच्या संपर्कात आल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. इंडोक्रिनोलॉजीमध्ये छापण्यात आलेल्या अभ्यासानुसार, कोलीनर्जिक एगोनिस्ट नावाचे औषध मासिक पाळी लवकर येण्यास कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे. या औषधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे मासिक पाळी लवकर येण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: मासिक पाळी दरम्यान टॅम्पॉन्स किंवा पॅड यापैकी कोणता आहे सर्वोत्तम पर्याय ?
लहान मुलांमध्ये सुद्धा हल्ली मासिक तणाव वाढू लागला आहे. मानसिक तणाव वाढल्यानंतर शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे सुद्धा मासिक पपाळी लवकर येऊ शकते. त्यामुळे महिला आणि मुलींनी आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवन जगले पाहिजे. वातावरणातील प्रदूषणामुळे अनेकदा आरोग्य बिघडून जाते. ज्याचा परिणाम झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात.