मासिक पाळी म्हणजे अशुद्ध रक्त शरीराबाहेर जाणे. हे सर्वांनाच माहीत आहे. महिलांना मासिक पाळीमध्ये येणाऱ्या रक्ताचा स्वतःचा वास असतो. पण काही महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान योनीतून प्रचंड दुर्गंधी येते आणि त्याची त्यांना लाज वाटू लागते. अशावेळी महिलांना आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये उभे राहण्यात आणि बसण्यात खूप त्रास होतो.
मासिक पाळीदरम्यान, योनीतून येणारा हा दुर्गंध अत्यंत सामान्यही असू शकतो मात्र अनेकदा महिलांना यामुळे त्रास होतो. या दुर्गंधीमागे अनेक कारणे आहेत, पण याचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. याशिवाय, इतर अनेक घटक आहेत ज्या विचारात घेणे आवश्यकता आहे. नाहीतर तुम्हाला पीरियड्समध्ये संसर्ग, दुर्गंधी इत्यादीसारख्या इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मासिक पाळीदरम्यान योनीतून वास येण्याची कारणे तुम्हाला माहीत झाल्यावर, त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.
या महत्त्वाच्या विषयावर आस्था दयाल, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, सीके बिर्ला हॉस्पिटल, गुरुग्राम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. एका हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी मासिक पाळीदरम्यान दुर्गंध येण्याचे कारण सांगितले आहे आणि ते टाळण्यासाठी काही टिप्सही दिल्या आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
हार्मोनल बदल
महिलांच्या मासिक पाळीच्या सायकल दरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत होणारे बदल हे योनीच्या पीएच संतुलनात बदल करू शकतात. यामुळे योनीमधून अधिक प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे हे महत्त्वाचे कारण ठरते.
बॅक्टेरियाशी संपर्क
मासिक पाळीदरम्यान, योनीतून बाहेर पडणारे रक्त बॅक्टेरियाच्या संपर्कात येऊ शकते. जीवाणू रक्त खंडित करतात आणि या प्रक्रियेत काही संयुगे सोडली जातात, जे योनीच्या गंधामध्ये योगदान देतात. ही एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र याचा परिणाम म्हणून कधीकधी तीव्र किंवा असामान्य गंध निर्माण होऊ शकतो.
वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष
चांगली स्वच्छता मासिक पाळीदरम्यान दुर्गंधावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. पीरियड्स दरम्यान, घाम, मृत त्वचेच्या पेशी आणि बॅक्टेरिया योनीमध्ये बराच काळ जमा होतात, ज्यामुळे दुर्गंधी वाढू शकते. फक्त नियमित आंघोळ करून, अंडरवेअर स्वच्छ करून आणि वेळोवेळी सॅनिटरी उत्पादने बदलून तुम्ही मासिक पाळीचा हा दुर्गंध कमी करू शकता.
[read_also content=”जागतिक मासिक पाळी दिन का साजरा केला जातो https://www.navarashtra.com/lifestyle/why-is-world-menstrual-hygiene-day-celebrated-on-28-may-know-the-history-importance-539172.html”]
धातूप्रमाणे (Metallic): मासिक पाळीच्या रक्तामध्ये लोह असते, ज्यामुळे धातूसारखा वास येतो.
कुजलेला वास (Rotten): योग्य स्वच्छतेच्या अभावामुळे किंवा कोणत्याही संसर्गामुळे मासिक पाळीत कुजलेला वास येऊ शकतो
गोड वास (Sweet Smell): जर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर तुमच्या मासिक पाळीला गोड वास येऊ शकतो
शरीराची दुर्गंधी (Body Odor): ज्याप्रमाणे घामामुळे शरीराला दुर्गंधी येते, त्याचप्रमाणे तुमच्या मासिक पाळीतही असाच वास येऊ शकतो
माशांचा वास (Fish Smell): जर तुमच्या मासिक पाळीत माशाचा वास येत असेल तर ते बॅक्टेरियल योनीसिस किंवा ट्रायकोमोनियासिस सारख्या संसर्गाचे लक्षण असू शकते
[read_also content=”तृतीयपंथीयांना मासिक पाळी येते का? https://www.navarashtra.com/latest-news/health/do-third-parties-have-menstrual-periods-the-information-is-amazing-nrng-104002.html”]
जर तुमच्या मासिक पाळीच्या रक्ताला माशासारखा वास येत असेल तर याचा अर्थ तुम्हाला तुमचा पॅड किंवा टॅम्पॉन बदलण्याची गरज आहे. मासिक पाळीच्या दरम्यान दुर्गंधीचा सामना करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे, त्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या –