विवाह करताना जोडीदाराचा रक्तगट सारखा असला तर? काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ, जाणून घ्या
विवाह जमवताना पुर्वीच्या काऴी वधु आणि वराची कुंडली पाहिली जात असायची. यात गोत्र आणि गुणदोष याचा सखोल ज्योतिषी अभ्यास करुनच विवाह जमवले जात असायचे. मात्र काळ बदलला तसं या गोष्टी काहीशा मागे पडल्या असल्या तरीही अजूनही कुंडली जुळवून पाहणं आजही अनेक ठिकाणी पाहिलं जातं. मात्र सध्याच्या काळात कुंडली पाहण्याबरोबर जोडीदाराच्या आरोग्याची कुंडली पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. लग्न करताना स्वभाव, जात, नोकरी आणि कुटुंब जसं पाहिलं जातं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे जोडीदाराची आरोग्य तपासणी करणं. लग्न करताना वधु आणि वराच्या आरोग्य तपासणी करताना कोणत्या चाचण्या कराव्यात याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या..
बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जोडीदाराचा एकच रक्तगट असू नये, असं असल्य़ास संततीप्राप्ती होताना यामुळे अनेक समस्या उद्भवतात.मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एकसारख्या रक्तगटाचा वैवाहिक आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही. असं असलं तरी लग्नाआधी मात्र जोडीदाराला रक्तदोष नाही ना हे जाणून घेणं ही तितकंच महत्वाचं आहे.
हा रक्तदोषाचा एक प्रकार आहे. यामध्ये मेजर आणि मायनर असे दोन प्रकार आढळतात. थॅलेसिमिया रुग्णांना एका विशिष्ट वेळेनंतर शरीरात रक्त भरावं लागतं. त्यामुळे याचा गंभीर परिणाम बाळाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता अधिक असते. समाजात बहुतांश जणांची लग्न ही नात्यातच केली जातात. त्यामुळे देखील होणाऱ्या बाळाला थॅलेसिमिया होण्याची शक्यता दाट असते. जर दोघांपैकी एकाला थॅलेसिमिया असेल तर लग्न जुळवण्यापूर्वी याबाबत वैद्यकीय सल्ला जरुर घ्या.
हिवाळ्यात त्वचेला भेगा पडू नयेत यासाठी काय काळजी घ्याल? तज्ज्ञांचा सल्ला
संततीप्राप्तीसाठी लग्नाआधीच जोडीदाराची जनुकीय चाचणी करणं महत्त्वाचं आहे ,असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. जनुकीय दोषांमुळे जन्माला येणाऱ्या संततीवर गंभीर परिणाम होतो.
लग्नाआधी जोडीदाराची एच आय व्ही चाचणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शारीरिक संबंधाने एच आय व्ही सारख्या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. दुर्दैवाने अजूनही या आजारावर ठोस औषध आलेली नाही. त्यामुळे विवाहासाठी जोडीदार निवडताना त्य़ाची शारीरिक चाचणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
थंडीच्या दिवसांत ‘या’ टिप्स फॉलो करा; राहाल निरोगी
हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे महिलांना गर्भधारणेच्यावेळी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तसंच प्रसुतीनंतर देखील महिलांमध्ये अशक्तपणा जाणवणं , सतत आजारी पडणं या समस्या निर्माण होतात. त्यामुळे लग्नाचा विचार करताना आपली आणि आपल्या जोडीदाराची आरोग्य तपासणी करणं महत्त्वाचं आहे, असा सल्ला कायमच वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो.
(ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)