वाढत्या थंडीच्या दिवसात आपले आरोग्य जपणे फार महत्वाचे आहे. या दिवसात वातवरणात काही बदलांमुळे आरोग्यवार परिणाम होण्याचे अफाट शक्यता असतात. या दिवसात आपले आरोग्य जपणे फार महत्वाचे असते. अशा काही गोष्टी आहेत किंवा टिप्स आहेत, ज्यांना आत्मसात करून आपण यंदाचा हिवाळा निरोगी घालवू शकतो. या गोष्टी केल्याने आपण आपल्या आरोग्याला नियंत्रित ठेऊ शकतो आणि सुरक्षित ठेऊ शकतो.
चला तर मग जाणून घेऊयात हिवाळ्यासाठी आरोग्यविषयक काही टिप्स. (फोटो सौजन्य - Social Media)
हिवाळ्यात सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे लसीकरण. लसीकरण केल्याने हिवाळयात उद्भवणारे आरोग्यविषयक धोके कमी होतात. फ्लू आणि कोविड-19 लसीकरणामुळे या काळात गंभीर आजाराची शक्यता कमी होते आणि या विषाणूंचा प्रसार होण्यापासून बचाव होतो.
जितके होईल तितके हात धुवत चला. हात धुणे हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. खासकरून फ्लूच्या मोसमात साबण आणि पाणी वापरून 20 सेकंदांपर्यंत हात धुवा, ज्यामुळे हानिकारक बॅक्टेरिया आणि विषाणू मारले जातात.
हिवाळ्यात बाहेर खेळणे कठीण होऊ शकते. बाहेरचा थंडावा शरीरासाठी घातकही ठरू शकतो. परंतु घराच्या आत शारीरिक सक्रियता ठेवणे महत्वाचे आहे. योग, स्ट्रेचिंग, किंवा इनडोअर वॉकिंगसारख्या क्रियाकलापांनी शरीर सक्रिय ठेवू शकता.
शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वूलन कपडे, स्कार्फ आणि दस्ताने घालणे आवश्यक आहे, ज्यामुळे थंडीमुळे होणारे आजार टाळता येतात. अशा काही टिप्स वापरून या थंडीच्या काळात आपण आपले आरोग्य निरोगी ठेऊ शकतो.
हिवाळ्यात घराच्या आत कोरडी हवा असते, जी त्वचा आणि श्वसन तंत्राला त्रास देऊ शकते. ह्युमिडिफायर वापरल्याने हवेतील ओलसरपणा कायम राहतो आणि त्वचा हायड्रेटेड राहते.