Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘2-2-2 वेट लॉस मेथड’ नक्की काय आहे? सर्रकन येईल वजनाचा काटा खाली

2-2-2 Weight Loss Method: वजन वाढणे एकदम सोपे आहे पण वजन कमी करताना सर्वांचीच दमछाक होते. वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती आहेत आणि त्यामध्ये 2-2-2 वेट लॉस मेथडची भर पडली आहे. काय आहे ही पद्धत यासाठी डाएटिशियनकडून आम्ही माहिती घेतली असून तुम्ही त्याचा वापर करू शकता.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 29, 2024 | 12:03 PM
वेट लॉस करण्यासाठी उत्तम पद्धत (फोटो सौजन्य -iStock)

वेट लॉस करण्यासाठी उत्तम पद्धत (फोटो सौजन्य -iStock)

Follow Us
Close
Follow Us:

खाण्यातील साखर सोडणे, तेलाचे सेवन कमी करणे, व्यायाम वाढवणे आणि दिवसातून अधिक वेळ व्यायामाला देणे किंवा विशिष्ट पेय पिणे यासह वजन कमी करण्यासाठी लोक अनेक गोष्टींचा प्रयत्न करतात. अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही पोटाची आणि कंबरेची चरबी कमी होत नाही. मात्र यासाठी एक विशेष पद्धत उपयुक्त ठरू शकते, जी सध्या खूप प्रभावी मानली जाते.

2-2-2 Weight Loss Method असे या पद्धतीचे नाव आहे आणि यामुळे वजन कमी होते असे डाएटिशियनचे म्हणणे आहे. काय आहे ही 2-2-2 Weight Loss Method आणि कशा पद्धतीने याचा वापर करू शकतो हे आपण या लेखातून जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

2-2-2 वेट लॉस मेथड म्हणजे काय?

वेट लॉससाठी २-२-२ पद्धतीचा अवलंब (फोटो सौजन्य – iStock)

डाएटिशियन आयुषी यादवने सांगितले की, वाढते वजन कमी करण्यासाठी 2-2-2 वजन कमी करण्याची पद्धत तुम्ही वापरू शकता. यामध्ये व्यायाम, संतुलित आहारासोबतच योग्य हायड्रेशनबाबत विचार केला जातो. ज्यांना हे डाएट करायचे आहे त्यांना ताजी फळे, भाज्या आणि पाणी 2-2-2 भागांमध्ये घेण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे 2 फळे आणि भाज्या, 2 लिटर पाणी आणि दिवसातून दोनदा चालणे या गोष्टी दिवसभरात पाळाव्या लागतात. 

असा सल्ला का दिला जातो?

वजन कमी करण्यासाठी योग्य सल्ला (फोटो सौजन्य – iStock)

आहारतज्ज्ञ आयुषीने सांगितल्याप्रमाणे, वजन कमी करण्यासाठी दिवसातून 2 लिटर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्याच वेळी तुम्ही भूकही चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकता. 

त्याचप्रमाणे, फळे आणि भाज्या दुप्पट भागांमध्ये खाव्या लागतील जेणेकरून आवश्यक पोषक घटक मिळतील. यानंतर सकाळ-संध्याकाळ 20 ते 30 मिनिटं चालत जा. हा एक सोपा पण प्रभावी व्यायाम आहे जो शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतो आणि तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. 

प्रसिद्ध का होत आहे ही पद्धत?

वेट लॉससाठी कोणती पद्धत वापरावी (फोटो सौजन्य – iStock)

2-2-2 वजन कमी करण्याची ही पद्धत सध्या लोकप्रिय होत आहे. कारण या पद्धतीचा अवलंब करणे सोपे आहे आणि तुम्हाला जास्त योजना करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणजेच वजन कमी करण्याची ही एक सोपी पद्धत आहे जी थोड्या मेहनतीने अवलंबली जाऊ शकते. 

मात्र आपल्याला हेदेखील लक्षात ठेवावे लागेल की साखर, मीठ आणि तेलाचे सेवन खूप कमी करावे लागेल. निरोगी वजन कमी करण्यासाठी दररोज 7 ते 8 तासांची शांत झोपदेखील आवश्यक आहे असेही डाएटिशियनने सांगितले आहे. 

2-2-2 वेट लॉस मेथडचे फायदे 

  • 30 ते 40 वयोगटातील चयापचय वाढवणे कठीण आहे. जर तुम्ही या वयात असाल आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ही पद्धत वापरून पाहू शकता
  • 2-2-2 पद्धती वापरल्याने तुम्हाला तुमचे आवडते अन्न सोडावे लागणार नाही, उलट तुम्ही सर्वकाही खाऊन वजन कमी करू शकता
  • निरोगी वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणासाठी ही पद्धत उत्तम ठरते 
  • या तंत्रात प्रथिने सेवन केल्याने, स्नायू दुरुस्त होतात आणि चयापचय कार्ये योग्यरित्या कार्य करतात
  • या तंत्रात निरोगी चरबीचा समावेश करण्यात आला आहे, जे हार्मोन्स नियंत्रित करते आणि पोषक तत्वांना योग्यरित्या शोषून घेण्यास अनुमती देते
  • या तंत्राच्या मदतीने तुम्ही कार्बोहायड्रेसचे सेवन करता ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. तसेच शरीरात ऊर्जा वाढण्यास मदत मिळते 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What is 2 2 2 weight loss method to burn belly fat and reduce obesity problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 12:03 PM

Topics:  

  • Weight loss

संबंधित बातम्या

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
1

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी
2

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
3

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट
4

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.