
सध्याच्या तरुणाईला प्रेम काय असतं? याचा अर्थच माहिती नाही. आर्धी तरुणाई प्रेमात बुडाली आहे तर आर्धी तरुणाई प्रेमाच्या नावाखाली वेगळंच काही तरी करत आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे ‘नॅनोशीप’. याला प्रेम तर म्हणता नाही येणार, पण भविष्याचा कसलाही विचार न करता, काही क्षणांसाठी उपभोगलेली हौस मौज म्हणजे ‘नॅनोशीप’. या नात्यासाठी एक चांगलाच शब्द वापरला जातो तो म्हणजे ‘One Night Stand.’
मुळात, नॅनोशीपमध्ये ना गोंधळ असतो, ना वचन असतात नाही कोणती भावनिक जोडणी! तुम्ही नॅनोशीपमध्ये आहात आणि तुम्हाला काही तरी झाले तरी तुमच्या पार्टनरला याचा फार काही फरक पडणार नाही, कारण यामध्ये कसलीही भावनिक जोडनीच नाही आहे. ना तुमच्या पार्टनरच्या तुमच्यावर प्रेम आहे. तरी काही विचित्र मानसिकतेचे तरुण काही हौस मौजेसाठी किंवा वेळ घालवण्यासाठी अशा नात्यात येतात आणि एकदाची हौस फिटली तर एकमेकांचा चेहराही पाहत नाहीत.
मुळात, नॅनोशिप या नावातच या शब्दाचा अर्थ दडला आहे. नॅनो म्हणजे लहान आणि शिप म्हणजे नाते. मुळात, नॅनोशीपला नाते म्हणणे नाते या शब्दाचा अपमान आहे. काही तासांच्या या नात्याला नॅनोशीप असे म्हणतात.
नॅनोशिप का होतोय लोकप्रिय?
आजच्या जीवनशैलीतला बदल आणि तरुणांची खुले विचारसरणी ही नॅनोशिपसारख्या नात्याच्या लोकप्रियतेची एक प्रमुख कारणं आहे. डिजिटल युगात दररोज नवीन लोक भेटतात, त्यांच्याकडे आकर्षित होण्याची शक्यता वाढते, आणि यात कुठलाही भावनिक गुंतवणूक किंवा कमिटमेंटची गरज नसते, हीदेखील या नात्याच्या वाढत्या लोकप्रियतेमागे मोठी कारणं आहे. हे नाते कितपत योग्य? आणि कितपत अयोग्य? हा ज्याच्या त्याच्या विचारसणीचा भाग आहे.