उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीने बनवा फेसमास्क
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक तेलकट आणि चिकट होऊन जाते. याशिवाय उन्हात फिरल्यामुळे त्वचा अधिक काळी दिसू लागते. त्वचेवर टॅनिंग वाढू लागल्यानंतर चेहरा अधिकच निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. चेहऱ्यासोबतच हातापायांवर टॅनिंग वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन ब्राइटनिंग ट्रीटमेंट करून घेतात. या ट्रीटमेंट केल्यानंतर त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या क्रीम सुद्धा उपलब्ध आहेत. मात्र क्रीममधील हानिकारक केमिकल त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी जावेद हबीब यांनी सांगितलेला सोपा उपाय सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सतत लिपस्टिक लावून काळवंडलेले ओठ काही क्षणात होतील गुलाबी! ‘या’ पद्धतीने घरी तयार घरगुती लीप मास्क
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही हानिकारक क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर होते. त्वचेसाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतात. कॉफीचा मास्क त्वचेवर लावल्यामुळे त्वचा अधिक निस्तेज आणि सुंदर होते. यासोबत तुमचा चेहरा सुंदर उजळदार होईल.
फेसमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात मध टाकून मिक्स करा. सर्व पदार्थ मिक्स झाल्यानंतर जाडसर पेस्ट तयार होईल. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल आणि चेहरा उजळदार दिसेल. आठवडाभर नियमित हा उपाय केल्यास उन्हामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कायमचा होईल नष्ट! शँम्पूमध्ये मिक्स करा ‘हे’ औषधी पाणी, केस होतील स्वच्छ
त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी जावेद हबीब यांनी सांगितलेला हा उपाय अतिशय प्रभावी ठरेल. याशिवाय तुम्ही वाटीमध्ये दही आणि बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद घालून मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्या. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. फेसपॅक लावून काहीवेळ ठेवल्यानंतर पाण्याने नंतर त्वचा स्वच्छ करून घ्या.