अलोपेसिया अरेटा हा कोणता विकार आहे
अलोपेसिया अरेटा हा केसगळतीचा सर्वात सामान्य विकार आहे. अलोपेसिया म्हणजे टक्कल पडणे आणि अरेटा म्हणजे केस गळणे आणि सामान्यतः सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांमध्ये दिसून येते. ॲलोपेसिया एरियाटामुळे टाळूवर आणि शरीराच्या इतर भागांवर केस लहान गोलाकार पॅचमध्ये (नाण्यांच्या आकाराचे) गळतात. एलोपिसिया एरेटा एक ऑटोइम्यून(Autoimmune Disease) आजार आहे. यात शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आणि पांढऱ्या रक्ताच्या पेशी, ज्यांचे काम आजारांशी लढण्याचे असते.
अशा पेशी हेयर फॉलिक्स (Hair Follicles)वर हल्ला करतात. त्यामुळे केस वेगानं गळायला सुरूवात होते. केस गळणे जसजसे वाढत जाते तसतसे पॅच एकमेकांना जोडतात आणि संपूर्ण टाळूवर टक्कल पडू लागते. हे केस सामान्यतः काही महिन्यांत पुन्हा वाढतात परंतु उपचार न केल्यास अशा प्रकारचे केस पुन्हा गळतात. केसांची वाढ आणि केस गळतीचे चक्र हे वर्षानुवर्षे टिकू शकते.
अलोपेसिया एरियाटा ही वेदनादायक स्थिती नाही परंतु एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आणि आत्मविश्वासावर परिणाम करते ज्यामुळे नैराश्य, चिंता आणि इतर भावनिक समस्या उद्भवतात. ॲलोपेसिया एरियाटा वर कायमस्वरूपी इलाज नाही पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचे योग्य व्यवस्थापन करु शकता आणि भविष्यात केस गळण्याची समस्या टाळू शकतात. डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक यांनी अधिक माहिती दिली आहे.
अलोपेसिया अरेटा कशामुळे होतो?
ही परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा इम्यून सिस्टीम चुकून हेयर फॉसिल्सना लक्ष्य करते. त्यामुळे केस गळतात. त्याची लक्षणे, कारणे आणि उपायांची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यामध्ये रोगप्रतिकारक प्रणाली केसांच्या कूपांवर हल्ला करते आणि त्यामुळे केल गळु लगतात व पातळ होतात.
शॅम्पूत ही जादुई गोष्ट मिसळा आणि कमाल बघा, केसगळती थांबेल, टक्कलवर उगवतील नवे केस
ॲलोपेसिया एरियाटास कारणीभूत घटक:
अलोपेसिया अरेटाची लक्षणे
जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये याचे पहिले मुख्य लक्षण म्हणजे टाळूवर पॅचेस पडणे. पापण्या, भुवया, दाढी, हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवरीलही केस गळतात. काही लोकांमध्ये, लक्षणे दिसण्यास विलंब होतो परंतु काही प्रकरणांमध्ये, ते जलद आणि अपरिवर्तनीय असू शकतात.केस गळाल्यानंतर सहसा पुन्हा वाढतात परंतु पुन्हा वाढलेले केस हे एकसारखे नसतात आणि ते हलके रंगाचे असतात. असे देखील होऊ शकते की जेव्हा एक पॅच पुन्हा वाढतो तेव्हा दुसरा पॅच तयार होऊ शकतो.
निदान कसे होते?
केस गळतीचे उपचार वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात जसे की सुरुवातीचे वय, केस गळण्याचे प्रमाण, नखांमधील बदल आणि इतर वैद्यकीय परिस्थिती. एक साधी ट्रायकोस्कोपी आणि त्वचेची बायोप्सी देखील ट तज्ञांना केस गळण्याचे प्रकार आणि कारण अधिक चांगल्या प्रकारे निर्धारित करण्यात मदत करतात.
अलोपेसिया अरेटाचे प्रकार
ॲलोपेसिया एरियाटाचे अनेक प्रकार आहेत. ते केस गळण्याच्या प्रमाणात वैशिष्ट्यीकृत आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या केस गळतीचे उपचारदेखील भिन्न आहेत
कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे होते केसगळती, का पडते टक्कल?
अलोपेसिया अरेटा केस गळती उपचार
अलोपेसिया एरियाटासाठी भारतात केस पुन्हा वाढवण्याचे उपचार तुमचे वय, केस गळण्याचे ठिकाण आणि तुमचे केस गळण्याचे प्रमाण यावर अवलंबून असेल. जर अलोपेसिया एरियाटा एक वर्षापेक्षा कमी कालावधीचा असेल तर तुमचे केस जास्त उपचार न करता वाढू शकतात. उपचार पर्याय काय आहेत:
मिनोक्सिडिल (Minoxidil): केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी ओव्हर-द-काउंटर मिनोऑक्सिडिल स्काल्पवर लावले जाऊ शकते
अँथ्रॅलिन (Anthralin): हे औषध प्रभावित भागात लागू केले जाते आणि केस गळतीस कारणीभूत असलेल्या रोगप्रतिकारक प्रतिसादात बदल करतात असं मानलं जातं.
कॉर्टिकोस्टिरॉईड्स (Corticosteroids): टॉपिकल किंवा इंजेक्टेड कॉर्टिकोस्टिरॉईड्स प्रभावित भागात जळजळ कमी करू शकतात आणि केसांच्या वाढीस उत्तेजन देऊ शकतात.