Hair Fall Causes: केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. हल्ली तर फारच कमी वयामध्ये मुली आणि मुलांमध्ये केसगळतीची ही समस्या दिसून येते. डॉक्टरांच्या मते, केसांचे गळणे हे तुमचे आतडे, हार्मोन्स, मानसिक आरोग्य आणि इतर अनेक अंतर्गत घटकांमुळे असू शकते. पण आणखी एक कारण आहे ज्यामुळे केस गळायला लागतात आणि ते म्हणजे एका विशिष्ट जीवनसत्वाची कमतरता. ब्युटिशियन स्मिता कांबळे यांच्याकडून आपण कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळतात हे जाणून घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
केस गळणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे आणि प्रत्येक घरात कोणी ना कोणी केस गळण्याची समस्या आहे. मात्र याचे नक्की कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया
जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल आणि तुमचे केस पातळ होत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरात एका विशिष्ट जीवनसत्वाची कमतरता आहे
शरीराच्या अंतर्गत समस्यांमुळे केस गळण्यास सुरुवात होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र नक्की कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे केस गळतात हे आपल्याला माहीत असायला हवे
Vitamin D केसांना मजबूत करते. जर व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर केस पातळ आणि विरळ होणे स्वाभाविक आहे, कारण व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे केसांचे फॉलिकल्स तयार होत नाहीत, ज्यामुळे केसांच्या वाढीचे चक्र बिघडते
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, आपण अटलांटिक मॅकेरल आणि सॅल्मनसारखे मासे खाऊ शकता. याशिवाय त्याची कमतरता दूध आणि अंड्यानेही दूर करता येते
व्हिटॅमिन ई हे एक प्रकारचे अँटिऑक्सिडंट घटक असून ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते आणि टाळू आणि केसांचे आरोग्य चांगले ठेवते. फ्री रॅडिकल्समुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होतो, ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि गळू लागतात
व्हिटॅमिन ई स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारते आणि केसांच्या पेशींचे पोषण करते. यासाठी पालक, ब्रोकोली, बदाम, शेंगदाणे इत्यादींचे सेवन करावे; याशिवाय तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूलही खाऊ शकता
व्हिटॅमिन बी 7 ला बायोटिनदेखील म्हणतात. बायोटिन हे कोएन्झाइमसारखे कार्य करते, जे प्रथिने आणि चरबीच्या चयापचय प्रक्रियेत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. केसांच्या वाढीसाठी चरबी आणि प्रथिने दोन्ही आवश्यक असतात
बायोटिनच्या कमतरतेमुळे केस पातळ आणि निर्जीव होऊ लागतात. केसही गळायला लागतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी रोज अंडी खा. बाजारात बायोटिन सप्लिमेंट्स देखील उपलब्ध आहेत, मात्र कृपया यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या
व्हिटॅमिन ए त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करते. त्याच्या कमतरतेमुळे, टाळू कोरडी होते, ज्यामुळे केस गळतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही गाजर, पालक आणि रताळे खाऊ शकता
व्हिटॅमिन बी 12 लाल रक्तपेशी तयार करते, जे केसांच्या वाढीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो. यामुळे तुम्हाला थकवा, अशक्तपणा आणि केसगळतीचा सामना करावा लागतो