केस गाळण्याची समस्या ही एक आता सामान्य समस्या बनली आहे. प्रदूषण, ताण-तणाव आणि आहारातील अपुऱ्या पोषणामुळे केसांचे आयुष्य कमी होत जाते. तसेच बऱ्याचदा केमिकलयुक्त प्रोडक्टसचा वापर केल्यामुळेही आपली केस खराब होत असतात. शारीरिक अस्वास्थ्य हे केस गाळण्याच मुख्य कारण आहे. विशेषतः केस धुतल्यानंतर असे जाणवते की, केसगळतीचे प्रमाण अधिकतर वाढले आहे. याचे कारण चुकीचे शॅम्पू आणि आवश्यक पोषणाची कमतरता असू शकते.
तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या शॅम्पूमध्ये काही घरगुती आणि नैसर्गिक अशा गोष्टी मिसळू शकता. याच्या मदतीने तुमचे केस मजबूत होतील आणि केसगळती देखील थांबेल. आज आपण अशा काही घटकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना शॅम्पूत मिक्स करून तुम्ही केसांना निरोगी बनवू शकता. यामुळे केसांना आवश्यक पोषण देखील मिळेल. तुम्हाला केसांच्या समस्या जाणवत असतील तर हे उपाय तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील.
हेदेखील वाचा – हिवाळ्यात फक्त 5 रुपयांत घ्या ओठांची काळजी, लगेच मिळेल आराम
आल्याचा रस मिसळा
केसांच्या वाढीसाठी आलं फार फायदेशीर ठरत. आल्यात असलेले जिंजरॉल घटक केसांच्या मुळांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे केसांचे पोषण चांगले होते. यासाठी शॅम्पूमध्ये थेंब आल्याचा रस टाका आणि मिसळा आणि ते केसांच्या मुलामध्ये लावून हलकासा मसाज करा. यामुळे केस गळणं कमी होईल आणि केसांची वाढ देखील झपाट्याने होऊ लागेल. आल्यामुळे केसांना चमक येते आणि केस मुळापासून मजबूत होतात.
कांद्याचा रस
कांद्यामध्ये सल्फर नावाचे रसायन असते जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. शॅम्पूमध्ये कांद्याचा रस टाकून मिसळल्यास केसांच्या मुलाचे पोषण वाढते आणि केस मजबूत होण्यास मदत मिळते. कांद्याचा रस नियमित वापरल्यास केस गळणं कमी होते आणि केसांची दाटी वाढते. यामधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांची टाळू स्वच्छ ठेवतात.
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई हे ऑक्सिडंट्सने समृद्ध असते. यातील ऑक्सिडंट्स केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायद्याची ठरत असते. व्हिटॅमिन ई कॅपस्यूलमधील तेलाचे काही थेंब शॅम्पूअमध्ये मिसळल्याने केसांना मुळापासून पोषण मिळते. यामुळे केसांच्या कोरडेपणा दूर होतो आणि केस लवचिक आणि चमकदार बनतात. यामुळे केसांचे तुटणे देखील कमी होते आणि केसांना आवश्यक ते बळ मिळते.
हेदेखील वाचा – Vaginitis म्हणजे काय? असुरक्षित लैंगिक संबंध ठरू शकतात व्हजायनल इरिटेशनचे कारण, वाचा सविस्तर
आवळा रस
आवळ्याच्या रसात व्हिटॅमिन सी असते जे केसांच्या वाढीसाठी फायद्याचे ठरते. शॅम्पूमध्ये आवळ्याचा रस मिसळल्याने केसांच्या मुलांना पोषण मिळते. यामुळे केस अधिक मजबूत बनतात. आवळ्याचे अँटी-ऑक्सिडंट्स केसांना बाहेरील प्रदूषणापासून संरक्षित ठेवतात आणि यामुळे केस गाळण्याची समस्या कमी होते. आवळ्याच्या नियमित वापरामुळे केसांची चमक वाढू लागते.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.