Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेंग्यू बरा झाल्यानंतरही जर दिसत असेल लक्षणं, तर हा असू शकतो पोस्ट डेंग्यू सिंड्रोमचा धोका

दर पावसाळ्यात डेंग्यूची साथ नेहमी पसरत असते. पण डॉक्टरांच्या योग्य उपचाराने डेंग्यू बरा सुद्धा होऊ शकतो. काही केसेसमध्ये डेंग्यू बरा झाला असला तरी काही लक्षणे दिसून येतात. अशा वेळी पोस्ट डेंगू सिंड्रोमचा धोका वाढतो. पण हा पोस्ट डेंगू सिंड्रोम नक्की आहे तरी काय. चला जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 01, 2024 | 09:15 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

 

पावसाळा सुरु झाला आहे आणि त्यासोबाबत सुरु झाली आहे ती रोगराई. याच मोसमात अनेक हॉस्पिटल्स डेंग्यूच्या रुग्णांनी भरले असतात. डास चावल्यामुळे होणाऱ्या डेंग्यूच्या आजारापासून स्वतःचे संरक्षण करणे खूप अवघड काम आहे. जे लोक डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात राहतात त्यांना डेंग्यूचा सर्वाधिक धोका असतो. अशावेळी आपल्याला डेंग्यूची लक्षणं माहित असणे गरजेचे आहे.

डेंग्यू हा एक धोकादायक आजार आहे, जो रूग्णांमध्ये सांधेदुखी, थकवा, अंगदुखी यांसारख्या लक्षणांसह दिसून येतो. सहसा योग्य औषधांच्या साहाय्याने 1-2 आठवड्यांत तुम्ही यापासून मुक्त होऊ शकतात. परंतु अनेक वेळा डेंग्यूमधून बरे झाल्यानंतरही लोकांना बरे वाटत नाही, हे पोस्ट डेंग्यू सिंड्रोममुळे होते. चला जाणून घेऊया, हा पोस्ट डेंग्यू सिंड्रोम नेमका आहे तरी काय.

पोस्ट डेंग्यू सिंड्रोम काय आहे?

पोस्ट-डेंग्यू सिंड्रोम म्हणजे डेंग्यूचा ताप दूर झाल्यानंतरही टिकून राहणाऱ्या लक्षणांचा समूह. यात प्रामुख्याने थकवा, अशक्तपणा, सांधेदुखी, डोकेदुखी आणि झोपेच्या समस्यांचा समावेश आहे. योग्य काळजी न घेतल्याने काही वेळा ही लक्षणे आठवडे किंवा महिन्यापर्यंत टिकून राहतात.

पोस्ट डेंग्यू सिंड्रोम टाळण्याचे मार्ग

विश्रांती घ्या: काही जण डेंग्यूमधून बरे झाल्यानंतर लगेच कामं करायला सुरुवात करतात परंतु हे असे करणे तुमच्या शरीरासाठी चांगले नाही. यामुळेच डेंग्यूमधून बरे झाल्यावर शरीराला पुरेशी विश्रांती द्या.

पौष्टिक आहार घ्या: प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजांची उपयुक्त असलेल्या पदार्थांचा जसे की फळे, भाज्या, कडधान्ये, अंडी, मासे आणि चिकन यांचा आहारात समावेश करा. तसेच इलेक्ट्रोलाइट्स असलेली पेय प्या.

तणाव टाळा: तणाव टाळण्यासाठी योग, ध्यान किंवा इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहा.

नियमित तपासणी करा: लक्षणे कायम राहिल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधा आणि नियमित तपासणी करा.

Web Title: What is post dengue syndrome

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 09:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.