सोशल मीडियावर आला आहे आधुनिक डेटिंगचा ट्रेंड
सोशल मीडियाच्या युगात सातत्याने नवनवीन बदल होताना दिसत आहे. सतत अपडेट होत असलेले मोबाईल. त्यातील ऍप्स इत्यादीगोष्टींचा प्रभाव जीवनशैलीवर होत आहे. त्यातील नव्याने चालू झालेले डेटिंग ऍप्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मॉर्डन डेटिंगने अनेक नवनवीन रूप घेतली आहेत. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन नाती जोडली जात आहेत,तर काहींना याच नवीन नात्यांमध्ये धोका मिळत आहे. सोशल मीडियाचा वापर जेवढं चांगल्या कामांसाठी केला जातो तेवढाच चुकीच्या कामांसाठी सुद्धा केला जात आहे. गंभीर नातेसंबंध, फ्लिंग, फायदे असलेले मित्र, परिस्थिती गोष्टी समस्या झाल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नव्याने आलेले टेक्स्टेशनशिप नक्की काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
टेक्स्टेशनशिप हा नातेसंबंधातील प्रकार आहे. या ऍपचा वापर करून अनेक लोक नवीन नाती बनवत आहेत. या नात्यांमध्ये समोरच्या व्यक्तीसोबत भेटून किंवा फोनवर बोलण्याऐवजी मेसजवर बोलण्यास जास्त प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अनेक लोक टेक्स्टेशनशिपच्या जाळ्यात अडकून पडले आहेत. या ऍपचा वापर करून अनेकांची फसवणूक सुद्धा होत आहे. काही व्यक्ती स्वतःच्या भावना व्यक्त करण्यास संकोचतात ते व्यक्ती मेसेजद्वारे भावना व्यक्त करण्यास पसंती देतात. या नात्यांना जनरल झेड असे सुद्धा म्हणतात.
हे देखील वाचा: आता रेल्वे तिकिटासाठी 120 दिवसांआधी रिझर्वेशन करता येणार नाही, बुकिंग प्रणालीमधील नवीन बदल जाणून घ्या
जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत बोलताना नेहमी मेसेज करण्यास जास्त प्राधान्य देणे. समोरच्या व्यक्तीची वैयक्तिकरित्या भेट न घेणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
तुम्हाला झालेला आनंद, दुःख किंवा प्रेम तुम्ही जर मेसेज करून शेअर करत असाल तर हे टेक्स्टिंगचे लक्षण असू शकते. समोर बोलून भावना व्यक्त न करता त्याच भावना मेसेजद्वारे व्यक्त केल्या जातात.
हे देखील वाचा: ‘या’ देशात मृत्यूनंतर व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात नाहीत; विचित्र परंपरा चर्चेत, जाणून घ्या यामागचे कारण
हल्ली सोशल मीडियाचा वापर चांगल्या आणि चुकीच्या अशा दोन्ही कामांसाठी केला जात आहे. मेसेज करून तयार केलेले नाते जोडणे सुद्धा खूप सोपे झाले आहे. तसेच नवीन नाती जोडून ती कोणत्याही गोष्टींचा वापर न करता लगेच तोडली सुद्धा जात आहे. सोशल मीडियामुळे आयुष्यातील आनंद आणि उत्साहाचे काही क्षण मोबाईल फोनमध्ये कैद झाले आहेत. आजकालची तरुणाई सोशल मीडियावर खूप जास्त व्यस्थ झाली आहे. सोशल मीडियावर तयार केलेली नाती वरचेवर बोलण्यासाठी तयार झाली आहेत.