फोटो सौजन्य: सोशल मीडिया
तुम्ही कधी असा विचार केला आहे का की मृत्युनंतर काय होते? जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात हा प्रश्न प्रत्येक संस्कृतीने वेगवेगळ्या पद्धतीने समजावून घेतला आहे. असाच एक अनोखा देश आहे जिथे लोक मृतांसोबत राहतात त्यांच्याशी बोलतात. विशेष म्हणजे या देशात दरवर्षी याचा उत्स साजरा केला जातो. आज आपण या देशाबद्दल त्यांच्या विचित्र परंपरेबद्दल आणि हे लोक असे का करतात यामागचे कारण जाणून घेणार आहोत. हे कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे.
इंडोनेशियात साजरा केला जातो असा उत्सव
इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर राहणाऱ्या तोराजा जमातीचे लोक मृत्यूला जीवनाचा आणखी एक अध्याय मानतात. ते आपल्या मृत पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी ‘मनेने’ नावाचा एक अनोखा उत्सव दरवर्षी साजरा करतात. या विचित्र परंपरेत ते कबरी उघडून मृतांचे सांगाडे बाहेर काढतात, त्यांना स्वच्छ करून, नवीन कपडे घालतात, आणि पूर्वजांशी संवाद साधतात अशी माहिती मिळाली आहे. होय, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे.
मृतांसोबत राहण्याची अनोखी परंपरा
इंडोनेशियातील तोराजा जमातीच्या लोकांचा असा विश्वास आहे की जोपर्यंत मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांचा आत्मा या जगातून पूर्णपणे जात नाही. म्हणूनच, ते त्यांच्या प्रियजनांना मृत्यूनंतरही जवळ ठेवतात. मृत व्यक्तींच्या सांगाड्यांना स्वच्छ करून त्यांना नवीन कपडे घालून, त्यांच्यासोबत नाचतात, बोलतात, अगदी त्यांना सिगारेटही देतात. ही परंपरा त्यांच्या दृष्टीने पूर्वजांशी कायमचे नाते जोडण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे.
मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेह लगेच दफन केला जात नाही
या उत्सवाचा एक अनोखा भाग म्हणजे तोराजा जमातीचे लोक नवनिर्मित मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाला लगेच दफन करत नाहीत, तर काही महिने घरात ठेवतात. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना मृतांच्या आत्म्याबरोबर राहण्याची संधी मिळते. उत्सवाच्या वेळी समाजातील लोक एकत्र येतात, मृतांची काळजी घेतात आणि कबरे स्वच्छ करून त्यांना पुन्हा दफन करतात. या सोहळ्यात मृतदेहांना जतन करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते.
लहान मुलांना पोकळ झाडांमध्ये पुरण्याची अनोखी प्रथा देखील आहे
त्याचबरोबर उत्सवात मोठ्या प्रमाणात नाचगाणे, बळी देणे आणि आनंद साजरा केला जातो. प्रामुख्याने म्हशी, डुकरे यांचा बळी दिला जातो, आणि बळीचे मांस पाहुण्यांना वाटले जाते. विशेष म्हणजे, लहान मुलांना पोकळ झाडांमध्ये पुरण्याची अनोखी प्रथा देखील इथे आढळते. तोराजा जमातीची ही परंपरा मृत्यूप्रती आदर आणि जीवनाबद्दलचा अनोखा दृष्टिकोन दर्शवते, ज्यामुळे जगातील इतर संस्कृतींना आश्चर्यचकित करणारा एक विशेष अंत्यविधी निर्माण झाला आहे.