स्वतःचं नवीन घर (home) घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर खरेदी करताना ज्याप्रमाणे घराचं स्ट्रक्चर, वास्तू इ. गोष्टी आपण पाहतो त्याचप्रमाणे घराचे डॉक्युमेंट्स देखील पाहणे गरजेचं असतं. तुम्हाला आम्ही सांगतो की टायटल डीड एक महत्वाचं डॉक्युमेंट (doument) आहे. हे असे डॉक्युमेंट आहे जे हे मालकाचे हक्क आणि दायित्वे आणि गहाण घेणार्याचे अधिकार देखील स्पष्ट करते.
तसेच ज्या जमिनीवर (land) मालमत्ता बांधली आहे ती जमीन कायदेशीररीत्या खरेदी केली गेली आहे की नाही आणि दिलेल्या परवानग्यांचे पालन करून बांधकाम केले आहे का, याचीही पडताळणी करणे बंधनकारक आहे. खरेदीदाराने ऋणभार प्रमाणपत्र तपासणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या मालमत्तेवर कोणतेही आर्थिक आणि कायदेशीर दायित्व नाही हे सिद्ध करणारे ऋणभार प्रमाणपत्र असते.
जेव्हा तुम्ही एखाद्या विकासकाकडून बांधकामाधीन मालमत्ता खरेदी करत असाल, तेव्हा कमेंसमेंट सर्टिफिकेटबद्दल अवश्य विचारा. या बांधकामासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे, याचा हा पुरावा आहे. त्याचबरोबर लेआऊट व ऑक्युपेंट सर्टिफिकेट देखील गरजेचे आहे सखींनो. हे डॉक्युमेंट्स तपासल्याशिवाय तुम्ही मालमत्ता विकत घेऊ नये असा आमचा सल्ला आहे.