Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

गेल्या एका वर्षात राज्यात 3 लाख 95 हजार 222 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून हा एक विक्रम आहे. सध्या 23 लाख 92 हजार 242 घरकुले प्रगतीपथावर आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2026 | 09:43 PM
“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?
Follow Us
Follow Us:

प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा उपक्रम
राज्यात जवळपास चार लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई: देशातील प्रत्येक कुटुंबाला घर उपलब्ध व्हावे, हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशात एकही कुटुंब घराविना राहू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला आहे. महाराष्ट्रातही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून गेल्या वर्षी राज्यात जवळपास चार लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गेल्या वर्षी राज्यातील 28 लाख 24 हजार 386 घरांना मान्यता देण्यात आली. ही देशाच्या इतिहासातील घरकुलांची सर्वात मोठी मंजुरी आहे. गेल्या एका वर्षात राज्यात 3 लाख 95 हजार 222 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून हा एक विक्रम आहे. सध्या 23 लाख 92 हजार 242 घरकुले प्रगतीपथावर आहेत. केंद्र शासनाने निधी वितरणासाठी ‘सिंगल नोडल एजन्सी’ आणि ‘रिअल टाइम इंटिग्रेटेड फंड ट्रान्सफर’ ही नवीन प्रणाली सुरू केल्यामुळे काही काळ हप्त्यांच्या वितरणात विलंब झाला होता. मात्र आता ही प्रणाली कार्यान्वित झाल्याने निधी वितरण सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माण-खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का; 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय

घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात राज्य शासनाने अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार घरकुलासाठी अतिरिक्त 50 हजार रुपये दिले जात आहेत. त्यापैकी 35 हजार रुपये बांधकामासाठी आणि 15 हजार रुपये घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी दिले जातात. याशिवाय मनरेगा अंतर्गत 90 दिवसांची मजुरी, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयासाठी 12 हजार रुपये मिळून एका घरासाठी सुमारे 2 लाख 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळते.

‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत अनेक कुटुंबाचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार; आशिष शेलारांचे प्रतिपादन

घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू मोफत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला असून पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत वाळू रॉयल्टीशिवाय उपलब्ध करून दिली जाते. तसेच भूमिहीन लाभार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी मिळणारे अनुदान 50 हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्याचे उद्दिष्ट 40 हजार 478 घरांचे होते. त्यापैकी 39 हजार 992 घरांना मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Jaykumar gore said 4 lakh houses completed in maharashtra under pradhan mantri awas yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • new house.
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Big Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; आता ‘हा’ नेता असणार देशाचा शिक्षण मंत्री
1

Big Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; आता ‘हा’ नेता असणार देशाचा शिक्षण मंत्री

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…
2

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…

‘मी स्वतः मोदींना भेटलो’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा, ‘त्या’ चर्चेच्या परिणामांमुळेच…
3

‘मी स्वतः मोदींना भेटलो’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा, ‘त्या’ चर्चेच्या परिणामांमुळेच…

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? प्रधानांचा राजीनामा अन् CM तातडीने दिल्लीला रवाना
4

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? प्रधानांचा राजीनामा अन् CM तातडीने दिल्लीला रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.