
स्ट्रोकवर करा उपाययोजना
संपूर्ण जगभरात स्ट्रोकमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा कायमचे अपंगत्व सहन करावे लागणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. स्ट्रोकचा धोका ज्यांना सर्वात जास्त आहे अशांसाठी, स्ट्रोकला कारणीभूत ठरणारे आजार किंवा आनुवंशिकता असणाऱ्या व्यक्तींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अजून जास्त महत्त्वाचे आहे. आजार लवकरात लवकर लक्षात येणे आणि त्यावर वेळीच योग्य ते उपचार केले जाणे महत्त्वाचे आहे.
यामुळे स्ट्रोकच्या केसेसची संख्या कमी होऊ शकेल, रुग्णांना उपचारांमधून मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा होऊ शकेल. स्ट्रोकचा धोका सर्वात जास्त असलेल्या व्यक्तींनी करावयाच्या महत्त्वाच्या उपायांची माहिती आपण या लेखामध्ये घेऊया. ज्यांची तीव्रता कमी करता येईल असे धोके, वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीतील पूरक बदल यांवर यामध्ये विशेष भर दिला आहे. डॉ. प्रदीप महिंद्रकर, चीफ ऑफ लॅब – पनवेल, अलिबाग आणि गोवा, मेट्रोपॉलिस हेल्थकेयर लिमिटेड यांनी ही अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
स्ट्रोकचा सर्वात जास्त धोका या व्यक्तींना
ब्रेन स्ट्रोक हे जगातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण : डॉ.ललित महाजन
स्ट्रोकचा धोका सर्वात जास्त असलेल्या व्यक्तींसाठी प्रतिबंधात्मक उपाय
हायपरटेन्शनवर नियंत्रण
रेट आणि रिदम नियंत्रण: एफिबवरील आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठीच्या औषधांमध्ये बीटा-ब्लॉकर्स, कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स आणि अँटी-अऱ्हिथमिक्स यांचा समावेश असतो. हृदयाचा सामान्य रिदम पुन्हा यावा यासाठी काही निवडक रुग्णांमध्ये अब्लेशन प्रक्रिया करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे तसेच त्यावरील उपाय; जाणून घ्या
स्ट्रोक येऊ नये यासाठी जीवनशैलीमध्ये करा हे बदल
वैद्यकीय उपायांच्या बरोबरीने जीवनशैलीमध्ये अनुकूल बदल करून स्ट्रोकचा धोका कमी करता येतो. काही महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे आहेत
योग्य उपाय करून स्ट्रोकमुळे निर्माण होणारे ताणतणाव खूप कमी करता येऊ शकतात, जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करता येते, स्ट्रोक आल्यास अपंगत्व आणि उपचार यासाठी, आरोग्याच्या देखभालीसाठी करावे लागणारे खर्च कमी होतात. आजार लवकरात लवकर लक्षात येणे, व्यक्तिगत देखभाल आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रम यांची सांगड घालून आपण हे संकट नक्कीच दूर करू शकतो.