फोटो सौजन्य - Social Media
जसे हृदयातील रक्ताचा पुरवठा नियंत्रणाच्या बाहेर जातो किंवा रक्त पुरवठा पूर्णपणे थांबतो तेव्हा असे म्हंटले जाते कि त्या पीडित व्यक्तीला हार्ट अटॅक आला आहे. तसेच जेव्हा मेंदूच्या कोणत्याही भागापर्यंत जेव्हा रक्त पुरवठा होत नाही किंवा विस्कळीत होतो तेव्हा या परिस्थितीस ब्रेन स्ट्रोक असे म्हटले जाते. एकंदरीत असे म्हणता येईल कि, ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूतील हार्ट अटॅक! कारण हार्ट अटॅकवेळी हृदयात ज्या गोष्टी घडतात त्याच गोष्टी ब्रेन स्ट्रोकवेळी मेंदूमध्ये घडत असतात.
ब्रेन स्ट्रोक येण्याअगोदर शरीरात काही लक्षणे जाणवतात ज्यांच्या आधारे ब्रेन स्ट्रोक वेळीच ओळखून सावध राहता येऊ शकते. या लक्षणांविषयी आणि उपायांविषयी सगळ्यांना माहिती असणे गरजेचे असते कारण वेळ कधीही सांगून येत नाही. जर आपल्याला याविषयी माहिती असेल तर कदाचित आपण पुढे कुणाचे जीव वाचण्याचे कारण ठरू शकतो.
स्ट्रोक येण्याचे लक्षणे
ब्रेन स्ट्रोक येण्याअगोदर शरीर आपल्याला लक्षणांमार्फत सावध करतो. ती लक्षणे वेळीच ओळखुन उपचार घेतले कि मोठी हानी टाळता येऊ शकते. स्ट्रोक येण्याअगोदर व्यक्तीचा चेहरा एका बाजूला झुकतो. त्याच्या बाहुंमध्ये एक प्रकारची कमजोरी येते, जसे कि ती बाजू पूर्णपणे आधु झाली आहे किंवा वात गेला आहे. व्यक्तीला बोलण्यात त्रास होतो, चालण्यात त्रास होतो तसेच बघण्यातही त्रास होतो. सगळं काही भुरकट-भुरकट दिसू लागते. डोक्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची वेदना असते. ही डोकेदुखी इतर डोकेदुखीपेक्षा त्रासदायक असते. एखाद्याला असे काही लक्षणे जाणवले तर त्वरित हॉस्पिटलमध्ये धाव घ्या.
स्ट्रोकवर उपाय
लक्षणे ओळखून त्वरित डॉक्तरकडे धाव घ्या किंवा ऍम्ब्युलन्स बोलावून घ्या. अशा परिस्थिती जास्त ताण न घेता शांत राहणे कधीही उत्तम ठरू शकते. त्यामुळे होईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. रुग्णाने आरामदायी स्थितीत झोपून राहावे पण चेहरा जरा उठिव बाजूवर असू द्यावा. अशा वेळेस काहीही खाणे आणि पिणे शक्यतो टाळावे.