श्वासोच्छवासावेळी डिझेल एक्झॉस्टमुळे फुफ्फुसांमध्ये जळजळ होते आणि शरीरावर श्वसन संक्रमणाचा परिणाम होतो. या संशोदनात आम्हालात असे शोधायचे होते की, प्रदुषणामुळे स्त्री आणि पुरुषांवर होणारे परिणाम किती आणि कसे वेगळे आहेत. ज्यात पाच महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता. हे सर्वजण निरोगी धूम्रपान न करणारे होते. प्रत्येक स्वयंसेवकाने चार तास फिल्टर केलेली हवा आणि चार तास डिझेल एक्झॉस्ट धूर असलेली हवा श्वासनादरम्यान घेतली. या वेळी आम्हाला जाणवले की, वायुप्रदुषणामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांवर अधिक दुष्परीणाम होतात.