
मकरसंक्रांती सणाला पतंग का उडवले जातात?
देशभरात सगळीकडे मकरसंक्रांत सण साजरा केला जात आहे. यादिवशी सर्वच महिला शेतातील धान्यांची आणि भाज्यांची पूजा करतात. मकर संक्रांत हा सण सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. कारण यादिवशी पतंग उडवली जाते तर तीळ गूळ देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. पूर्वीच्या काळापासून संक्रांतीच्या दिवशी तीळ गूळ खाणे ही परंपरा आहे. कारण यादिवशी मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांत सण निसर्ग, एकता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. यंदाच्या वर्षी सूर्य 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दरवर्षी मकर संक्रांतीला पतंग उडवली जाते. चला तर जाणून घेऊया पतंग उडवण्यामागे नेमके काय आहे कारण?(फोटो सौजन्य – istock)
मकर संक्रांतीच्या काळात सूर्य दक्षिणायन संपवुन उत्तरायणात प्रवेश करतो. या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा असतो. या सूर्य अधिककाळ पृथ्वीवर असतो. सूर्यप्रकाश घेणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सूर्यकिरण विविध आजारांवर प्रभावी ठरतात. हा सूर्यप्रकाश घेता यावा म्हणून पतंग उडवण्याची परंपरा अस्तित्वात आली. मकरसंक्रांत हा सण जुने वाद मागे सारून नवीन सुरुवात करण्याचा दिवस असतो. पतंग उडवण्याच्या निमित्ताने सर्व लोक एकत्र येतात. पतंग आकाशात उडते तेव्हा वेगवेगळे रंग आकाशात दिसतात.पतंग हे शुभ, आनंद आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. यानिमित्ताने सूर्याची किरण अंगावर पडतात. प्रभू रामचंद्र लहान असताना भावांसोबत आणि बाल हनुमानासोबत पतंग उडवत असे तो काळ उत्तरायणाचा होता, रामचरितमानसच्या बालकांडात भगवान राम पतंग उडवायचे, असा उल्लेख करण्यात आला आहे.
सूर्य किरणांच्या लख्ख उजेडात पतंग उडवली जाते. पतंग उडवताना शारीरिक हालचाली वाढतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पतंग उडवण्याची परंपरा सुमारे २,००० वर्षे जुनी आहे. सूर्याची किरण शरीरासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते, हाडे मजबूत होतात आणि शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळ्वण्यास मदत होते. मुघलांच्या काळात पतंग उडवणे हा त्यांचा लोकप्रिय छंद होता. तसेच त्याच्यात अनेक स्पर्धा सुद्धा लागायच्या.