
world thinking day 2026 report 81 percent indians overthinking three hours daily
World Thinking Day 2026 theme : आज २२ फेब्रुवारी, संपूर्ण जग ‘जागतिक विचार दिन’ (World Thinking Day) साजरा करत आहे. मात्र, याच दिवशी भारतीयांच्या मानसिक आरोग्याबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेंटर फ्रेश आणि YouGov यांच्या संयुक्त ‘इंडिया ओव्हरथिंकिंग रिपोर्ट’ नुसार, भारतीय लोक सकारात्मक विचारांऐवजी ‘अतिविचार’ (Overthinking) करण्याच्या विळख्यात अडकले आहेत. आयुष्यातील मोठे निर्णय तर सोडाच, पण “हॉटेलमध्ये काय ऑर्डर करायचे?” इथपासून ते “बॉसच्या ‘Ok’ मेसेजचा अर्थ काय?” इथपर्यंत भारतीय तासनतास विचार करत बसतात.
या अहवालातील सर्वात धक्कादायक आकडा म्हणजे, ८१ टक्के भारतीय दररोज किमान ३ तास ओव्हरथिंकिंग करतात. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४ पैकी १ व्यक्तीने कबूल केले की, त्यांना सतत विचार करण्याची सवय लागली आहे. हे ओव्हरथिंकिंग केवळ करिअरपुरते मर्यादित नाही. सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यापूर्वी ५९% लोक “हा फोटो चांगला दिसेल का?” या विचारात ५ तास घालवतात. इतकेच नाही तर, ६३% भारतीयांना निवडणुकीत मतदान करण्यापेक्षा हॉटेलच्या मेनूमधून डिश निवडणे जास्त तणावाचे वाटते.
हे देखील वाचा : Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…
अतिविचारांच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी भारतीय आता तंत्रज्ञानाचा आधार घेत आहेत. या अहवालानुसार, ३ पैकी १ भारतीय नागरिक आपले विचार शांत करण्यासाठी किंवा गोंधळ दूर करण्यासाठी ChatGPT किंवा Google चा वापर करत आहे. मेसेजचे उत्तर काय द्यावे, जोडीदाराला काय गिफ्ट द्यावे किंवा ऑफिसमधील कठीण प्रसंगात काय बोलावे, यासाठी चॅटजीपीटी हे भारतीयांचे अनधिकृत ‘थेरपिस्ट’ बनले आहे.
World Thinking Day 2025: हा विशेष दिवस “आपले जग, आपले भविष्य” या थीमसह साजरा केला जात आहे, जाणून घ्या महत्त्व#worldthinkingday #marathinews https://t.co/xrTpovkUJL — Navarashtra (@navarashtra) February 22, 2025
credit – social media and Twitter
आजचा दिवस केवळ ओव्हरथिंकिंगवर चर्चा करण्यासाठी नाही, तर सकारात्मक विचारांसाठी आहे. १९२६ मध्ये सुरू झालेला हा दिवस यंदा आपले १०० वे वर्ष (Centenary Year) साजरे करत आहे. हा दिवस ‘गर्ल गाईड्स’ आणि ‘गर्ल स्काउट्स’ चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल आणि ओलेव्ह बेडन पॉवेल यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. यंदाच्या जागतिक विचार दिनाची थीम “आपली मैत्री” (Our Friendship) अशी आहे. जगातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्यात मैत्रीचे नाते घट्ट करणे आणि जागतिक समस्यांवर विचार करून सकारात्मक बदल घडवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
हे देखील वाचा : Oceanographic Research 2026: धोक्याची घंटा! हिंद महासागरात वाहतेय गोडे पाणी, शास्त्रज्ञ चिंतेत
तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावरील तुलना आणि माहितीचा अतिमारा (Information Overload) यामुळे लोकांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. ‘Gen Z’ आणि तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण (Over-analysis) करण्याच्या सवयीमुळे मानसिक थकवा येतो. म्हणूनच, हा विचार दिन आपल्याला “जास्त विचार करण्यापेक्षा योग्य विचार” करण्याचे आवाहन करत आहे.
Ans: दरवर्षी २२ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. यंदा १९२६ पासून सुरू झालेल्या या दिवसाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
Ans: या अहवालानुसार ८१% भारतीय दिवसातील ३ तासांहून अधिक वेळ अतिविचार करतात आणि १/३ लोक यातून बाहेर पडण्यासाठी AI (उदा. ChatGPT) चा वापर करतात.
Ans: २०२६ सालची थीम "Our Friendship" (आपली मैत्री) ही आहे, जी जागतिक स्तरावर मैत्री आणि सौहार्द वाढवण्यावर भर देते.