फोटो सौजन्य: iStock
कुठल्याही महिलेसाठी लग्न ही खूप महत्वाची गोष्ट असते. परंतु लग्न झाल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातीलच एक सामान्य समस्या म्हणजे वजनात झालेली वाढ. लग्नानंतर अनेकदा महिलांचे वजन वाढते. असे होणे अगदी सामान्य असून त्यामागे अनेक कारणं असू शकतात. यामध्ये शारीरिक, भावनिक आणि जीवनशैलीतील बदलांचा समावेश असतो. चला जाणून घेऊया लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्याची कारणं कोणती.
लग्नानंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. हे विशेषतः जेव्हा स्त्रीला गर्भधारणेची इच्छा असते तेव्हा घडते. साहजिकच हार्मोन्समधील बदलांमुळे मेटाबॉलिज्म आणि पचनक्रियेवरही परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढू शकते.
हे देखील वाचा: Parenting Tips: मुलीला ‘प्रिन्सेस ट्रिटमेंट’च नाही तर 5 पद्धतीने द्या आत्मविश्वास
लग्नानंतर महिलांच्या खांद्यावर नवीन जबाबदाऱ्या येतात. घरातील कामे, नातेसंबंधातील चढ-उतार, करिअरच्या चिंता इत्यादी गोष्टी त्यांच्या खांद्यावर ओझे बनतात. यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढते. परिणामी वजन देखील वाढू शकते. तणावामुळे खाण्याच्या पद्धतीही बदलतात, ज्याचा परिणाम महिलांच्या वजनावर होतो.
हल्ली लग्नाआधी अनेक स्त्रिया परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी भरपूर डाएटिंग आणि व्यायाम वगैरे करताना दिसतात, पण लग्नानंतर ते त्यांच्या वैवाहिक जीवनात अडकल्यामुळे त्यांना आपल्या वजनाकडे हवे तितकेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे मेहनतीने कमी झालेले वजन पुन्हा वाढते.
हे देखील वाचा: साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ, वाचा सोपी रेसिपी
लग्नसमारंभात भरपूर तळलेले पदार्थ असतात, जे वधूही खाते. तसेच लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींसोबत मुलीला त्यांच्या जेवणाची सवय करून घ्यावी लागते. या खाण्याच्या सवयींचा महिलांच्या खाण्याच्या पद्धतींवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर महिलेच्या सासरच्या लोकांनी जास्त फॅट असणारे पदार्थ खाल्ले तर त्या घरातील महिलाही तेच पदार्थ खाऊ लागण्याची शक्यता असते.
लग्नानंतर, महिलांना नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अनेकदा उशिरापर्यंत जागावे लागते आणि सकाळी सगळ्यांच्या आधीच उठावे लागते. या झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन्सही वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. अपुऱ्या जेवणामुळे भूकही वाढू लागते.
लग्नानंतर अनेकांचे वजन जरी वाढत असले तरी स्त्रीला या नात्यात अधिक सुरक्षितता वाटते. आपल्या सुखं दुःखात कोणीतरी आपली जवळची व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आहे, यामुळे ती अधिक आनंदी आणि समाधानी होते.