सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ
नेहमीच जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं हे सुचत नाही. सतत बाहेरचे तेलकट तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर चवीला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यावेळी तुम्ही मालपुआ बनवू शकता.मालपुआ बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. मालपुआ बनवताना साखरेचा वापर न करता तुम्ही गुळाचा वापर करू शकता. कारण साखरेचे पदार्थ मधुमेह आणि इतर आजार असलेले रुग्ण खाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. गूळ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करून मालपुआ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा दुधी भोपळ्याची मसालेदार काप