
‘आई’ म्हणजे प्रेम, वात्सल्य, माया, ममता, शिस्त. जभरातील प्रत्येक सजीव जीवाला जन्म देणारी ही आई असते. आपल्या मुलांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना धीर देणे, प्रसंगी धीर देत कुशीत मोथेर घेणारी,आपल्या चिमुकल्यांच्या प्रगतीसाठी झटणारी आईच असते. दरवर्षी सगळीकडे मातृदिन साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी देव जाऊ शकत नाही म्हणून त्याने सगळ्यांना देवाच्या रूपात आई दिली आहे. लहान असताना बोट धरून चालण्यापासून ते मोठे झाल्यानंतर काम करताना प्रत्येक ठिकाणी आईची आठवण आपल्या येते. दरवर्षी १२ मे ला हा मातृदिन साजरा केला जातो. आईबद्दल भरभरून बोलण्याचा दिवस म्हणजे ”मातृदिन”
मातृदिनाचा इतिहास:
जगभरातील प्रत्येक देशामध्ये मातृदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा केला जातो.काही देशांमध्ये मातृदिन साजरा करण्याच्या वेगवेगळ्या तारखा आहेत पण भारत, अमेरिका (यूएसए), कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह इतर काही देशांमध्ये मातृदिन हा १२ मे ला साजरा केला जातो. ही परंपरा मागील ११२ वर्षांपासून सुरु आहे. कित्येक वर्षांपासून सुरु असलेली परंपरा अजूनही सुरु असून सगळीकडे मोठ्या आनंदात हा दिवस साजरा केला जातो. मदर्स डे चा इतिहास ग्रीस या देशाशी संबंधित आहे. प्राचीन काळामध्ये ग्रीक आणि रोमन लोक रिया आणि सायबेले या मातृदेवतांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करत होते. मात्र याबाबत फारशी माहिती कुठे उपलब्ध नाही. पण आधुनिक काळात म्हणजे २० व्या शतकात अमेरिकेमध्ये पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला होता. त्यामुळे हा दिवस अजूनही सर्वच देशांमध्ये साजरा केला जातो.
मातृदिनाची सुरुवात अशी झाली:
आईच्या सन्मानार्थ पहिल्यांदा अमेरिकेमध्ये मातृदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्वच देशांमध्ये हा दिवस साजरा केला जात आहे. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस यांनी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यासाठी सगळ्यांना प्रेरित केले होते. आईचे अथक कष्ट, मुलांना जन्म देताना होणाऱ्या वेदना, समाजसेवेतील तिचे बलिदान यामुळे खूप प्रेरणा मिळते. Anna Jarvis यांचे त्यांच्या आईवर खूप जास्त प्रेम होते. पण काही दिवसानंतर त्यांच्या आईचे निधन झाले. तेव्हा आईबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मातृदिनाची सुरुवात केली. त्यानंतर कालांतराने जगभरातील सर्वच देशांमध्ये मातृदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. मातृदिनाला विशेष महत्व आहे कारण, या दिवशी आईबद्दल प्रेम व्यक्त करणे, मुलांचे संगोपन करणाऱ्या माता, कुटुंब आणि समाजासाठी त्याग करणाऱ्या सर्व मातांना समर्पित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे.